मंगेश पांडे, पिंपरीवाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या नावाखाली कारवाई करीत असतानाच शेजारीच उभ्या असलेल्या रिक्षा, तसेच आर्थिक हितसंबंधातून रस्त्यावर उभी असणारी खासगी प्रवासी वाहने मात्र वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांना दिसत नाहीत. ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आली. वास्तविक रिक्षा व खासगी प्रवासी वाहनांमुळेच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचेही दिसून आले. वाहन उचलण्यापासून तर ते सोडवून देण्यापर्यंतची कामगिरी टेम्पोवर दुचाकी उचलण्याचे रोजंदारीवर काम करणारे तरुणच पार पाडत असल्याचेही उघडकीस आले. या ‘दलालां’मुळे कारवाईदरम्यान वाहतूक पोलीस ‘अदृश्य’ आहेत की काय, असेच वाटत होते. ‘नो पार्किंग’ आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाचा टेम्पो व क्रेन फिरत होते. नियमाप्रमाणे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सरसकट वाहनांवर कारवाई होणे गरजेचे असताना ठरावीक वाहनांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून वाहने रस्त्यावर उभी केली असताना त्याकडे वाहतूक पोलीस काणाडोळा करीत होते. दुचाकी टेम्पोत टाकल्यानंतर लगेचच दुचाकीमालक त्या ठिकाणी आल्यास तडजोडीचा व्यवहार टेम्पोचालकच करीत असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणतात, साहेबांकडे जा?वाहन आणण्यासाठी वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणेच वाहनमालकाला वागणूक दिली जाते. त्या ठिकाणी त्यांचा पहिला सामना वाहन उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांशीच होत होता. वाहतूक पोलिसाऐवजी वाहन उचलणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनच वाहनमालकावर प्रश्नांचा मारा केला जात होता. त्यांच्यामार्फत तडजोड न झाल्यास ‘साहेबां’कडे जा, असे सांगितले जात होते. वाहनचालकांचा होतो गोंधळएटीएममध्ये काही मिनिटांच्या कालावधीसाठी गेलेल्यांचे वाहन काही क्षणांतच गायब झालेले असते. वाहन अचानक गायब झाल्याचे पाहून चालकही थबकून जातो. काय करावे काही सुचतच नाही. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर आपले वाहन वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याचे समजते. वाहन कसे मिळेल, त्यासाठी कोठे जावे लागेल, याबाबत कसलीही उमग नसलेला वाहनमालक गोंधळून जातो. पावत्याही वेगळ्या रकमेच्याकारवाईदरम्यान दुचाकी उचलल्यास त्याचे ५० रुपये टेम्पो भाडे आकारले जाते. मोटारीला २५० तर जड वाहनांना १ हजार रुपये भाडे आकारले जाते. दंड पावतीची रक्कम वेगळी आकारली जाते. टेम्पोच्या खाली उतरेना हवालदारवाहनावर कारवाई करताना संबंधित वाहनचालकाची चुकी आहे का, कशा पद्धतीने वाहन लावायला हवे होते, खरोखरच ‘नो पार्किंग’ अथवा वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने उचलली जात आहेत का, याबाबतची शहानिशा जबाबदार व्यक्ती म्हणून हवालदाराने करणे गरजेचे आहे. मात्र, हवालदार निवांतपणे टेम्पोत बसून होते. टेम्पोच्या खाली उतरण्याचीही तसदी घेतली जात नव्हती. टेम्पोवर काम करणाऱ्या तरुणांना वाटेल ती वाहने टेम्पोत टाकली जात होती.
कारवाईदरम्यान वाहतूक पोलीस अदृश्य
By admin | Published: November 19, 2014 4:27 AM