शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:49 AM

जर तुम्ही ट्रिपल सीट जात असाल, जर तुम्ही नो एंट्रीमधून जात असाल अगर रस्त्याच्या कडेला कुठेही मोटार उभी करीत असाल तर सावधान... कारण वाहतूक पोलिसांनी या तीनही नियमभंगाविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतली

पुणे : जर तुम्ही ट्रिपल सीट जात असाल, जर तुम्ही नो एंट्रीमधून जात असाल अगर रस्त्याच्या कडेला कुठेही मोटार उभी करीत असाल तर सावधान... कारण वाहतूक पोलिसांनी या तीनही नियमभंगाविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतली आहे.आगामी काळात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. गेल्या आठवड्याभरात या तीनही कारवायांमध्ये ८ हजार १९४ वाहनचालकांवर कारवाई करीत जवळपास १४ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.विरुद्ध बाजुने येणाºया आणि ट्रीपल सीट दुचाकी चालकांमुळे अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असून यामुळे अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याच्या कडेला कुठेही मोटारीउभ्या करण्याचेही प्रमाण वाढले असून त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत चालली आहे. याचा गांभिर्याने विचार करुन वाहतूक पोलिसांनी १८ जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.विरुद्ध बाजुने येणाºया वाहनचालकांचे विशेषत: दुचाकी चालकांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. सरळ जात असलेल्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध बाजुने आलेल्या वाहनचालकांमुळे अपघातांचा सामना करावा लागतो. सरळ जात असताना वेग अधिक असल्याने अनेकदा वाहनचालकांना सावरण्याचीसंधी मिळत नाही. काहीदिवसांपूर्वीच नगर रस्त्यावर विरुद्ध बाजूने आलेल्या टँकरमुळे झालेल्या अपघातात सात तरुणांना प्राण गमवावे लागले होते.तर दुचाकींवर ट्रिपल सीट बसून वेडीवाकडी वळणे घेत जाणारे दुचाकीचालक सर्रास दृष्टीस पडतात. या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधूनहोत आहे. मोठमोठ्याने दुचाकींचेहॉर्न वाजवित जाणारे हे तरुण रस्त्यावरून जात असलेल्या वाहनचालकांनाच दांडगाई करतात. अनेकदा महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक वाहनचालकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो.सर्वसामान्यांना या नियमभंग करणाºया वाहनचालकांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. ट्रिपल सीट जाणारे, विरुद्ध बाजुने येणारे आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभे करुन जाणा-या वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.गेल्या आठच दिवसांतकेलेल्या कारवायांमधून चौदा लाखांचा दंड वसूल करण्यातआला असून येत्या काही दिवसांतही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.225 तळीरामांवर गटारीदिवशी कारवाईआषाढातील आमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाºया मद्यपार्ट्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर कारवाईची पूर्वतयारी केली होती. आमावस्येच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील तब्बल २२५ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या सर्वांवर खटले भरण्यात आले असून न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयामध्ये दंड भरून त्यांची सुटका करण्यात आली.वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. अन्य वाहनचालकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये, तसेच अपघात घडू नयेत याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रिपल सीट जाणारे, विरुद्ध बाजुने येणारे आणि रस्त्याच्या बाजुला बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाºयांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.- अशोक मोराळे, उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा