पुणे : बालाजीनगर येथे पंपामध्ये लावलेल्या गाडीला जॅमर लावून चालकाकडून दीड हजार रुपये घेऊन सोडून दिली. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी वाहतूक शाखेतील पोलीस शिपायास निलंबित केले आहे़. विक्रम गणपत फडतरे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे़. याबाबतची माहिती अशी, विक्रम फडतरे हे भारती विद्यापीठ वाहतूक शाखेत नियुक्तीला होते़ सागर राऊत (रा़. राजेवाडी, ता़. खंडाळा, जि़. सातारा) यांनी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बालाजीनगर येथे पंपामध्ये जीप लावली होती़. या गाडीला फडतरे यांनी जॅमर लावला़. त्यांना ५ हजार रुपयांची पावती करावी लागेल, असे सांगितले़. त्यानंतर सागर राऊत यांच्याकडून दीड हजार रुपये घेऊन जॅमर काढून निघून गेले़. राऊत यांच्या तक्रारीनंतर याची चौकशी करण्यात आली़. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी त्यांना शुक्रवारी निलंबित केले आहे़.
जॅमर कारवाईचे पैसे खिशात घालणारा वाहतूक पोलीस शिपाई निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 8:19 PM