पुणे - देशात राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने उत्तम क्रमांक पटकाविला असला तरी येथील वाहतूककोंडीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीने पुणेकर बेजार झाला आहे. माणसांपेक्षा वाहने जास्त झाली की हे होणार होते़ त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे़ संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आदींचा विचार करून ही यादी तयार केली आहे. पण यामध्ये पुणेकरांना दररोजच्या जगण्यासाठी वाहतुकीच्या चक्रव्यूहातून कसा मार्ग काढावा लागतो, याचा उल्लेख नाही.पुण्यातील मध्यवस्तीत राहणे परवडत नसल्याने उपनगरांमध्ये राहण्याची पुणेकरांवर वेळ. दररोज किमान दोन तास वाहतूककोंडीचा अनुभव.नगर रस्त्यावर सर्वाधिक वाहतूककोंडी. सकाळी आणि सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दीसिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल, राजाराम पूल येथपासून सुरू होणारी वाहतूककोंडी थेट धायरीपर्यंत कायम असते. सायंकाळी सिंहगड रस्त्याने जाणे म्हणजे किमान दीड तास वाहतूककोंडीत अडकणे.जंगली महाराज रस्त्यावर कधी अचानक वाहतूककोंडी होईल सांगता येत नाही.प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता या ठिकाणी वाहतूककोंडी सुरू झाल्यावर किमान अर्धा तास तरी सुटत नाही.लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी जाणे म्हणजे पुणेकरांच्या अंगावर काटा येतो. वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नाही. रिक्षाने जायचे म्हटले तरी केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर अडकावेच लागते.पुणे स्टेशन परिसर म्हणजे शहराचे केंद्र. बाहेरचा माणूस आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा वाहतूककोंडीत अडकतो.मेट्रो भुयारी की वरून यात आपण अनेक वर्षे वाया घालविली़ आता ती प्रत्यक्षात येत असली तरी तिला आणखी काही काळ जावा लागणार आहे़ सार्वजनिक वाहतूक सुविधा म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या पीएमपीएमएलची अवस्था कधीही विश्वासार्ह नव्हती आणि नाही़ तिच्यात मूलभूत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न कधीही झाला नाही़मुंबईत ४ ते ५ किलोमीटरच्या रस्त्यांवरील सिग्नल एकापाठोपाठ सिंक्रोनायझेशनमुळे लागोपाठ मिळतात. पुण्यात हे चित्र दिसत नाही. रस्त्यांवरील जवळजवळचे सिग्नल सिंक्रोनाईज करणे, मोठ्या रस्त्यांवर लेन शिस्त पाळण्यासाठी वाहनांना बाध्य करणे़ वारंवार वाहतूककोंडी होणाºया ठिकाणाची पाहणी करून तेथील वाहतुकीत काही बदल करून ती कोंडी सोडविता येईल का, यासाठी प्रयत्न करण्याची जरुरी आहे़वाहतूककोंडीची कारणेसंपन्नता वाढली : पुण्यामध्ये संपन्नता वाढल्यामुळे एके काळी सायकलींचे शहर दुचाकींचे आणि मोटारींचे होऊ लागले आहे. प्रत्येक घरात किमान दोन ते तीन दुचाकी आहेतच; पण आता मोटारही आली आहे. मोटारींच्या वाढत्या संख्येचा ताण रस्त्यांवर येतो.छोट्या अंतरावर जाण्यासाठी खासगी कॅब सेवेचा वापर वाढला आहे.शहरात वाहने वाढली; परंतु रस्त्यांची रुंदी वाढली नाही. उलट सुशोभीकरणासारख्या प्रकल्पांमुळे कमीच झाली.
राहण्यायोग्य उत्तम शहर वाहतूककोंडीने बेजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 2:34 AM