शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

चार मिनिटासाठी वाहतूकीचे नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 8:41 PM

वाहतूक शाखेने केलेल्या चाचणीत नियम ताेडून वाहन चालविले तरी ठराविक अंतर पार करण्यास लागणाऱ्या वेळेत फारसा वेळ लागत नसल्याचे समाेर अाले अाहे.

पुणे : पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक असल्याने राेजच नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागते. हिंजवडी, वाघाेली येथे सतत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीला तर नागरिक पुरते वैतागले अाहेत. वाहनांची संख्या अधिक असणे हे जरी वाहतूक काेंडीचे एक कारण असले तरी बेशिस्त वाहनचालक हे वाहतूक काेंडीचे प्रमुख कारण अाहे. पुणे वाहतूक पाेलीसांनी केलेल्या एका चाचणीतून वाहतूकीचे नियम ताेडून वाहन चालविल्यास तसेच वाहतूकीचे सर्व नियम पाळून वाहन चालविल्यास फारसा फरक पडत नसल्याचे समाेर अाले अाहे. पाेलिसांनी केलेल्या चाचणीत नियम पाळणाऱ्या वाहनचालकाला नियम माेडणाऱ्या वाहनचालकापेक्षा अवघे 4 मिनिटं जास्त एक ठराविक अंतर पार करण्यास लागल्याचे समाेर अाले अाहे.     वाहतूक शाखेचे चार कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही चाचणी करण्यात अाली. कात्रज चाैक भाजी मंडई ते शिवाजीनगर येथील सिमला अाॅफिस चाैकापर्यंतचे अंतर पार करण्यात अाले. साध्या वेशातील कर्मचारी सकाळी 10.30 वाजता कात्रज येथून निघाले. यातील एका दुचाकीवरील कर्मचाऱ्याने सर्व नियमांचे पालन केले त्यात हार्न न वाजविणे या नियमाचाही समावेश करण्यात अाला हाेता. तर दुसऱ्या दुचाकीवरील कर्मचाऱ्याने वाहतूकीचे काेणतेही नियम पाळले नाहीत. यात नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला हे अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटे लागले तर सर्व नियम पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला 28 मिनिटे लागले. दाेन्ही वाहनचालकांमध्ये केवळ 4 मिनिटांचा फरक हाेता. त्यामुळे नियम ताेडून कशाही पद्धतीने वाहन चालवून केवळ चार ते पाचच मिनिटांचा जास्तीचा वेळ लागताे, परंतु या चार मिनिटांसाठी अनेक वाहनचालक स्वतःबराेबरच इतरांचाही जीव धाेक्यात घालत असतात. या उलट नियम पाळल्यास सुरक्षित व वेळेत निश्चित स्थळी पाेहचण्यास नागरिकांना शक्य हाेणार अाहे. 

    त्यामुळे सर्व वाहनचालकांना वाहतूकीचे सर्व नियम पाळण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून करण्यात अाले अाहे. ही चाचणी पुण्याचे पाेलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अाली. या चाचणीवेळी वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, दत्तवाडी वाहतूक विभागाचे पाेलिस निरिक्षक कमलाकर ताकवले, संपतराव भाेसले, ढगे अादी उपस्थित हाेते. तर या चाचणीत दत्तवाडी वाहतूक विभागातील पाेलिस नाईक बाठे, पाेलिस शिपाई शिंदे व सहकारनगर वाहतूक विभागातील पाेलिस नाईक गिरमे अाणि चाैधरी सहभागी झाले हाेते. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसnewsबातम्या