नीरा (पुणे) : पुरंदर तालुक्यातील पुणे-मिरज लोहमार्गावर पिसूर्टी येथे रेल्वेची घडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार (दि.१८) रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटली नसून मृत व्यक्तीने चौकड्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे शरीराचे अनेक तुकडे झाल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहे. या भागतील कोणाच्या घरातील व्यक्ती हरवली असल्यास जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.