पुणे : जुन्या बांधणीच्या रेल्वे डब्यांना गाडी सुरू होताना व थांबताना बसणारे झटके आता थांबले आहेत. मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने त्यासाठी नवीन उपकरण विकसित केले असून, त्याचा वापर संबंधित गाड्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.लिंक हॉफमन बुश (एलएचबी) बांधणीच्या डब्यांबाबत प्रवाशांची नेहमीच तक्रार असायची. गाडी सुरू होताना तसेच ब्रेक लावल्यानंतर डब्यांना झटके बसत होते. त्यामुळे त्याचा प्रवाशांना त्रास व्हायचा. याबाबत प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. त्यावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पहिल्यांदा उपाय काढला आहे. दोन डब्यांना जोडण्यासाठी ‘सेंटर बफर कपलर सिस्टीम (सीबीसी)’ वापरली जात होती. त्यातील ड्राफ्ट गिअरमध्ये काही बदल करून रेल्वे डिझाईन अॅन्ड रिसर्च आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) ने नव्या रचनेचे ‘बॅलेन्स्ड टाईप ड्राफ्ट गियर’ हे उपकरण विकसित केले आहे. मध्य रेल्वेत पहिल्यांदा पुणे विभागात या उपकरणाचा वापर सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पुण्यातून सुटणारी सिकंदराबाद शताब्दी, अहमदाबाद दुरांतो तसेच मुबंई इंटरसिटी गाड्यांमधील दोन डब्यांना या नवीन उपकरणाद्वारे जोडण्यात आले आहे. यामुळे गाडी सुरू झाल्यानंतर तसेच थांबताना कोणत्याही प्रकारचे झटके जाणवत नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वेगाड्यांचे झटके कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:56 AM