तळेगाव दाभाडे : कलाकारांमधील अभिनय फुलण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची नितांत गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी येथे व्यक्त केले.कलापिनीच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या दुसऱ्या पर्वात रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना लोणकर यांनी आपले मत मांडले. सुप्रसिद्ध लेखक, नाटककार प्रशांत दळवी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लोणकर या दाम्पत्याशी गप्पाची मेजवानी आणि ज्येष्ठ कलाकारांचा एकसष्टीनिमित्त सन्मान करण्यात आला. कलापिनीच्या बालभवन, कुमारभवन मधील कलाकारांचा पण विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाकलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी आपल्या प्रास्ताविकात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची सांगड घालणारा हा वर्धापन दिन आहे. हास्ययोग, बालभवन आणि कुमारभवन हे कलापिनीतील आनंदाचे कारंजे आहेत असे सांगितले़कलापिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र रानडे, जाणता राजा या महानाट्याचे प्रकाश योजनाकार व कलापिनीला आणि पुण्यातील अनेक हौशी नाट्य संस्थांना कायम मदत करणारे प्रकाश योजनाकार गजानन वाटाणे, कलापिनीच्या वास्तू-प्रकल्पाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे नारायण अभ्यंकर आणि महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार मिळालेले प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचा दळवी आणि लोणकर यांचे हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.कलापिनीच्या ४० वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेणारे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. चारचौघी, आणि आम्ही कुमुद प्रभाकर आपटे या प्रशांत दळवी लिखित आणि प्रतीक्षा लोणकर यांनी अभिनय केलेल्या नाटकातील प्रवेश विनया केसकर, शर्मिला शहा, अनघा बुरसे, मुक्ता भावसार, दीपाली गजेंद्रगडकर, दीपाली देशपांडे या कलापिनीच्या कलाकारांनी सादर करून पाहुण्यांना त्यांच्या गतकाळाची सफर घडविली. लोणकर आणि दळवी यांच्या मनमोकळ्या गप्पा, त्यांच्या अनुभवकथनाने तळेगावकर रसिक आणि कालापिनीचा युवावर्ग मंत्रमुग्ध झाला होता. कलापिनीचे ज्येष्ठ रंगकर्मी, गायक आणि संगीत दिग्दर्शक विनायक लिमये यांनी तयार केलेल्या लोणकर आणि दळवी यांच्या कारकिर्दीतल्या माईलस्टोन ठरलेल्या चित्रपट आणि नाटकातील ध्वनिचित्रफितींमुळे कार्यक्रमाची लज्जत आणखीनच वाढली. कलापिनीचे विश्वस्त डॉ. परांजपे आणि केसकर यांनी लोणकर आणि दळवी यांचा जीवनपट रसिकांसमोर उलगडत नेला. आयोजन चेतन पंडित, विराज सवाई, प्रतीक मेहता, प्रणव केसकर, शार्दुल गद्रे, मिहीर देशपांडे, हृतिक पाटील, विशाखा बेके, मुक्ता भावसार, सौरभ शेटे, विनायक काळे आणि रश्मी पांढरे व श्रीपाद बुरसे, जयवंत काका, अशोक बकरे व सुमेर नंदेश्वर (ध्वनिसंयोजन) यांनी केले. (वार्ताहर)स्वास्थ्य योग : कुलकर्णी, बेलसरेंचा गौरवलोणकर आणि दळवी यांच्या हस्ते खालील पुरस्कार वितरित करण्यात आले.बालभवन सितारा पुरस्कार : गार्गी लंबाते, मनोमय खेडकर (केंद्र शाखा), संस्कार धावने (यशवंतनगर)कुमार भवन पुरस्कार : केतकी काटदरे, श्रावणी पाचलग, गीतिका सुतार.शिबिरार्थी विशेष पुरस्कार : आराधना राजहंस, सायली यादवकै. पुष्पलता अरोरा स्मृती प्रोत्साहन पुरस्कार: पल्लवी पांढरेस्वास्थ्य योग पुरस्कार: वसुधा कुलकर्णी, माधुरी बेलसरेविशेष गौरव : श्रीपाद बुरसे
प्रशिक्षणाने फुलतो अभिनय
By admin | Published: May 04, 2017 2:23 AM