पुणे : जिल्ह्यातील तीन लाख शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये १५० मास्टर ट्रेनर हे तालुकास्तरावर ४ हजार ५०० शिक्षकांना प्रशिक्षीत करणार असून, हे शिक्षक नंतर मुलींना धडे देणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.जिल्हा परिषद आणि भारतीय जैैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट गर्ल’ उप्रकम सुरू करण्यात आला. यामध्ये सुरूवातील १५० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. आत हे मास्टर ट्रेनर जिल्ह्यातील ४ हजार ५०० शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस तालुकास्तरावर हा उपक्रम होणार असून, त्यानंतर हे शिक्षक मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहे. शालेय मुलींना अत्याचाराविरोधात सक्षम करण्यासाठी आता जिल्हा परिषदेने स्मार्ट गर्ल बनविण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यतच्या सुमारे पावणेचार लाख (३ लाख ८५ हजार) मुलींना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरकारी अनुदानित तसेच खासगी शाळेतील मुलींना हे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलींना ‘स्मार्ट गर्ल’ बनविण्यासाठी जिल्हा परिषदेत उच्चस्तरीय बैठक झाली होती. यासाठी ९७ केंद्र निश्चित करण्यात आली असून, यामध्ये शहरी भागात ४२ तर ग्रामीण भागात ५५ केंद्र असणार आहेत. अत्याचाराविरोधात लढण्याबरोबरच या शालेय मुलींना जनजागृतीचे धडे दिले जाणार आहे.मुलींवर शाळां, महाविद्यालये तसेच परिसरात अत्याचार होतात. त्याविरोधात लढण्याचे प्रतिकार कसा करावा, याचे धडे त्यांना दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ९७ केंद्राम्च्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील शाळांचा समावेश करण्यात आलेला नाही.- दौलत देसाई, मुख्य कार्यकारीअधिकारी, जिल्हा परिषद
साडेचार हजार शिक्षकांना प्रशिक्षण - दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:31 AM