शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बोन्साय कलेचे प्रशिक्षण द्यावे : शरद पवार; पहिल्या जागतिक बोन्साय परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:19 PM

बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारलेल्या पहिल्या जागतिक बोन्सायविषयक परिषदेचे व प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.

ठळक मुद्देबोन्साय ही कला जपान किंवा चीनची नव्हे, तर भारताची : शरद पवारबोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्याकडून पवार यांनी घेतली बोन्सायविषयी माहिती

पुणे : बोन्साय ही कला जपान किंवा चीनची नव्हे, तर भारताची असून ती भारतातच वाढली आणि बौद्ध धर्माच्या बरोबर तिचा भारताबाहेर प्रसार झाला. चीन व जपान या दोन देशांनी यामध्ये उत्तम यश मिळविले असून या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर पैसादेखील कमावीत आहेत. बोन्सायचे हे प्रदर्शन प्रेरणादायी असून त्याद्वारे नवकलाकारांना प्रशिक्षण मिळून त्यांचा या कलेच्या वाढीसाठी फायदा होईल, असे उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले. बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारलेल्या पहिल्या जागतिक बोन्सायविषयक परिषदेचे व प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, जपानचे कौन्सिल जनरल रायोजी नोडा, इंडोनेशियाचे बोन्साय मास्टर रुडी नाजान, इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी किशोर खरात, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कावेरीबाई काळे, गिरीधर काळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.    त्याआधी आज सकाळच्या सत्रात शरद पवार यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्याकडून बोन्सायविषयी माहिती घेतली.  प्रदर्शन  रविवार (दि. २५) पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू राहणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, की देशाला उद्योगपूरक विकासाची गरज आहे. बोन्साय साहित्याची मागणी ही भविष्यात वाढत जाईल व भारताची लोकसंख्या पाहता बोन्साय कला शिकणे ही एक संधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या कलेचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापरदेखील करता येऊ शकेल. शेतकºयांना या कलेमधून अर्थार्जनाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.   साधारणत: एक दशक आधी मी जागतिक स्तरावरील बोन्सायच्या प्रदर्शनाचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बोन्साय या कलेकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल आणि बोन्साय या कलेच्या विकासाचा पुढील प्रवास वेग घेईल, असा विश्वास असल्याचे प्राजक्ता काळे यांनी व्यक्त केला. बोन्साय फक्त श्रीमंतांची कला, हे मत मला बदलायचे आहे. ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यास त्या शेताच्या बांधावरदेखील प्री बोन्साय मटेरीअलचे उत्पादन करून शकतील. बोन्सायविषयक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव जर शेतीविषक शिक्षणात करण्यात आला तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असेही काळे यांनी या वेळी नमूद केले.    या वेळी प्राजक्ता काळेलिखित ‘बोन्साय’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे