लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समजातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ज्या जिल्ह्यात स्थानिक गरज व जे उद्योग चालतात त्याचेही तांत्रिक प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत द्यावे. जेणेकरून असे छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या तरुण व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवता येईल, असा प्रस्ताव सारथीच्या बैठकीत राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
या बैठकीला सारथीचे अधयक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीता नागर कौशल्य विकास सहसंचालक अनुपमा पवार, प्रकल्प संचालिका ज्योत्स्ना शिंदे, डॉ. श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना घाटगे यांनी सांगितले की, सदस्यांनी या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवली आहे. सारथी संस्थेने मान्यता दिली तर याची सुरुवात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी कोल्हापुरातून करावी.