११ जून ते २१ जून या कालावधीत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणातून शिक्षकांना सकारात्मक शिस्तीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त कशी निर्माण करता येईल, याचे प्रशिक्षण प्रशिक्षक योगी पटेल यांनी विविध कृतीद्वारे दिले. शिक्षकांना देखील प्रशिक्षणाच्या निमित्ताने चौकटी बाहेर जाऊन शिकण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण अनुभवण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षण सत्रे अत्यंत परस्परसंवादी, कृतिशील आणि नावीन्यपूर्ण, विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित करून त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणातून विशेष मार्गदर्शन मिळाले.
शालेय शिस्तीच्या दृष्टिकोनातून विविध प्रसंग व प्रश्नांवर सखोल चर्चा करून प्रत्येक प्रसंग अथवा विद्यार्थी कशा पद्धतीने हाताळावा, याचे प्रशिक्षण दिले. संस्थेचे चेअरमन सुभाष परमार यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापिका मानसी मारुलकर दकर आणि जसेता मॅन्युअल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.