पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली आहे. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कालखंड पूर्ण झाल्याने हर्डीकर यांची बदली झाली आहे. गेल्या वर्षी हर्डीकर यांचा तीन वर्षांचा कालखंड पूर्ण झाला होता पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बदली लांबणीवर पडली होती. कोरोनात चांगली कामगिरी केल्याने बदली लांबणीवर पडली होती.
कोरोनाचा विळखा कमी झाल्याने हर्डीकर यांची बदली होणार होती. मात्र हर्डीकर यांचे कोरोनातील काम चांगले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुदतवाढ दिली होती.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदासाठी राजेश पाटील, योगेश म्हसे आणि सुहास दिवसे यांच्या नावाची चर्चा होती. सहा महिन्यापासून पिंपरीला आयुक्त कोण येणार याबाबत चर्चा रंगली होती. या चर्चेवर आज पडदा पडला आहे. हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
.............................................
राजेश पाटील ओळखस्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. पाटील यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले आहे.