या उद्घाटनाप्रसंगी मर्सडिज बेंज चाकण कंपनीचे मंदार कुलकर्णी, शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभाताई तांबे, संस्थेचे कार्यकर्ते सुदाम चपटे, शांताराम गुंजाळ, देवराम असवले, कृष्णा वडेकर, शंकर लांघी, संजीव असवले, धर्मा असवले, रोहण तावडे, होम सेवा संस्थेचे राठोड व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
मंदार कुलकर्णी यांनी आदिवासी भागातील गावांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावांच्या मागणीनुसार जलशुद्धीकरण प्रकल्प बसवले आहेत. हे प्रकल्प पूर्ण कार्यान्वयित आहेत. कुलकर्णी म्हणाले की, हे प्रकल्प गावास हस्तांतरित करत आहोत. यापुढे प्रकल्पाची काळजी दुरुस्ती, देखभाल गावाने करावयाची आहे. रोहण तावडे यांनी तांत्रिक माहिती दिली. शंकर लांघी यांनी सर्वांचे अभार मानले.