PMPML मधील बदल्या भाजपच्या हितसंबधातून; काँग्रेसचा आरोप, सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा बोजवारा

By राजू इनामदार | Published: October 25, 2023 04:31 PM2023-10-25T16:31:05+5:302023-10-25T16:31:51+5:30

भाजपने पुण्याला नेहमीच दुय्यम वागणूक दिली असून, पीएमपीएमएल कडे जाणुनबुजून दुर्लक्ष

Transfers in PMPML from BJP interests Congress allegation burden on public passenger transport | PMPML मधील बदल्या भाजपच्या हितसंबधातून; काँग्रेसचा आरोप, सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा बोजवारा

PMPML मधील बदल्या भाजपच्या हितसंबधातून; काँग्रेसचा आरोप, सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा बोजवारा

पुणे: शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचा एकमेव पर्याय असलेल्या पुणे महानगर परिवहन सेवेची (पीएमपीएल) मुख्य अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या करून वाट लावण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या हितसंबधांमधूनच या बदल्या केल्या जात आहेत असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी या बदल्यांमागे भाजपचे हितसंबध आहे असे स्पष्ट आरोप केला. कोणत्याही व्यवस्थेची, त्यातही एकमेव सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा असलेल्या व्यवस्थेची कार्यक्षमता तिथे मुख्य पदावर कोण काम करते आहे यावर अवलंबून असते. भाजपला शहरातील ही व्यवस्थाच मोडकळीस आणून तिचे संपूर्ण खासगीकरण करायचे असे दिसते आहे. कारण त्याशिवाय मुख्य पदावरील अधिकाऱ्यांच्या अशा वारंवार बदल्या केल्या गेल्या नसत्या असे जोशी म्हणाले.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी शहरातंर्गत प्रवास करण्यासाठी हा एकमेवर पर्याय आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील सुमारे १२लाख प्रवासी पीएमपीतून दररोज प्रवास करतात. पीएमपीएमएल कडे सोळाशे बसगाड्या असून १० हजार कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. पीएमपीएमएलच्या कारभाराचा एवढा मोठा पसारा आहे. परंतु भाजपच्या नेत्यांचे हितसंबंध यातील खरेदी-विक्रीमध्ये दडलेले असल्याने  शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना बदलले जात आहे. भाजपने पुण्याला नेहमीच दुय्यम वागणूक दिली असून, पीएमपीएमएल कडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला.

सचिंद्र प्रतापसिंह चांगला कारभार करत होते. कारभाराला शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता,उत्पन्न वाढू लागले होते, प्रवासी वाढावेत अशा दिशेने ते काम करत होते. तरीी अवघ्या चार महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली. यापूर्वी ओमप्रकाश बकोरिया या प्रामाणिक अधिकाऱ्याचीही मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली. असे मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हायला हवी, असे भाजप नेते भाषणांमधून सांगत असतात, प्रत्यक्षात कृती मात्र पीएमपीएमएल या सार्वजनिक सेवेला दिशाहीन करणारी आहे. भाजपच्या हितसंबंधांचा डाव पुणेकरांनी ओळखावा आणि पीएमपीएमएल ला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, यासाठी पुणेकरांनी दबाव आणावा, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

Web Title: Transfers in PMPML from BJP interests Congress allegation burden on public passenger transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.