पुणे : पुणे शहर वाढत असून त्यात ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. तसेच आयुक्तालयाअंतर्गत नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहे. पुण्यात आणखी एक परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पुणे शहरात सध्या ५ परिमंडळांमध्ये ३० पोलीस ठाण्यांची विभागणी करण्यात आली आहे.
पुणे शहरातील अनेक प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे. चतु:श्रृंगी, हडपसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक नवीन पोलीस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच हवेली, लोणी काळभोर पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समावेश करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
याबाबत पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, हवेली, लोणी काळभोर पोलीस ठाणे तसेच अन्य नवीन पोलीस ठाण्यांबाबतच्या प्रस्तावाचा आढावा घेत आहे. त्याचबरोबर शहरात आणखी एक परिमंडळाची आवश्यकता वाढत आहे. त्यादृष्टी पोलीस ठाणे व विभागांची फेररचना करण्याचा विचार आहे. सध्या त्यावर चर्चा सुरु असून काही दिवसात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. शहरातील पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्याही प्रस्तावित आहेत. शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाहतूकीच्या नियोजनाचा आराखडा तयार केला जात आहे. पुढील २५ वर्षांचा विचार करुन वाहतूक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यामध्ये पोलीस आपल्यापरीने योगदान देत आहे. ................
नवरात्र मंडळे, मंदिर विश्वस्तांच्या बैठका घेणारशासनाने अद्याप मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली नाही. नवरात्र उत्सव जवळ आला आहे.अशावेळी शहरातील प्रमुख देवींची मंदिरांचे विश्वस्तांची बैठक घेण्यात येणार आहे. नवरात्र काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पोलीस प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी सांगितले.
..........
सीसीटीव्ही संख्या वाढविणारपुण्यात रोडवर बसविण्यात आलेले सीसीटीव्हीचे नेटवर्क आता जुने झाले असून त्यावरील कॅमेऱ्यांची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे जुने व खराब झालेले कॅमेरे बदलणे, नवीन ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे व नेटवर्क सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.सध्या साधारण १ हजार सीसीटीव्ही रोडवर आहेत. त्याची संख्या दीड हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी सांगितले.