पुणे : पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापौर विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आता मंदिराचे दगडी वास्तूस दिलेला रंग काढणे, सभोवताली फरसबंदी करणे, मंदिराच्या छताचे वॉटरप्रूफिंग करणे आदी विविध कामे करणार आहे. ओंकारेश्वर मंदिराचा कायापालट होणार असून, गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन सन १७३६ मध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या मंदिराच्या दुरुस्ती व जतन संवर्धनाची कामे करण्यासाठी खास तरतूद केली आहे. महापौर विकास निधीतून दहा लाखांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली. तब्बल ९ कळस असे वैशिष्ट्य असलेले ओंकारेश्वर मंदिर आहे.
पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराचा होणार कायापालट, स्थायी समितीची निधीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:08 PM
पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापौर विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
ठळक मुद्दे मंदिराचा कायापालट होणार असून, गतवैभव प्राप्त होण्यास होणार मदतमहापौर विकास निधीतून दहा लाखांचा निधी खर्च करण्यास मान्यता