काळे यांच्या नागेश्वर ग्रामविकास पॅनलने १३ पैकी ९ जागा मिळवत, विस्कळीत विरोधकांचा धुव्वा उडवत स्पष्ट बहुमत मिळविले. यामध्ये अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. मात्र, गावचे माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांनी आपल्या वॉर्डचा गड शाबूत ठेवला.
निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामपंचायतमध्ये सत्ता परिवर्तन करायचेच, असा चंग बांधलेल्या रवींद्र काळे यांनी शेवटपर्यंत शांत आणि संयमी नियोजन केले. वेळप्रसंगी एखाद्या विरोधकासही आपल्या गटात सामिल केले, तर कधी एखाद्या स्वकियांशीही दोन हात करण्याची तयारी ठेवली. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुशिक्षित युवा उमेदवारांची निवड केली. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवावर्गाच्या साथीने प्रस्थापितांच्या बालेकिल्यास भगदाड पाडून विजयश्री खेचून आणली. स्पष्ट बहुमत मिळाल्याने, अस्थिर आणि घोडेबाजार राजकारणास लगाम बसला असून, विकासकामास गती येणार आहे.
काळे गटाचे विजयी उमेदवार:
वॉर्ड क्र. १.
१) काळे शामकांत राजहंस
२) काळे संजय ज्ञानदेव
३) काळे सुषमा भाऊसाहेब
वॉर्ड क्र. ४.
१) माळी संजय सुभाष
२) गव्हाणे राजश्री संदीप
३) सूर्यवंशी पार्वती बापू
वॉर्ड क्र. ५.
१) अनुसे परशुराम भाऊसाहेब ( बिनविरोध )
२) गायकवाड स्वाती संतोष
३) जाधव सारिका संतोष
तर इतर विजयींमध्ये
वॉर्ड क्र. २
१) दुर्गे अतुल पांडुरंग
२) काळे लिला दिलीप
वॉर्ड क्र. ३.
१) ढोरजकर शामकांत बबन.
२) ताठे लता जिजाबा
हे उमेदवार विजयी झाले.
घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन यमराज काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे क्रियाशील अध्यक्ष व समाजसेवक संतोषराव काळे, माजी सरपंच विजय भोस यांच्या भावजय या प्रमुख दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. निवडीनंतर सर्वच विजयी उमेदवारांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
‘संपूर्ण गावात प्रथमच पॅनल टाकले. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करून उत्तम प्रतिसाद दिला. वरील सर्व पातळ्यांवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने गावच्या विकास कामास गती मिळेल,’ रवींद्र काळे (पॅनल प्रमुख), अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. शिरूर
निमोणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांनी आमदार ॲड. अशोक पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.