भीमा-पाटसचे माजी संचालक डी. के. खळदकर यांच्या पत्नी विमल खळदकर यादेखील सर्वाधिक ७०० मतांनी विजयी मिळविला. दिग्गजामध्ये नानगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास भोसले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विशाल शेलार यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजय पॅनेलचे नेतृत्व राजकुमार मोटे, अशोक खळदकर, आबासाहेब खळदकर, मनोहर गुंड यांनी केले.
--
विजयी उमेदवार असे. वाॅर्ड क्रमांक १ - संदीप पोपटराव खळदकर, भाग्यश्री दीपक खळदकर, आशा सुखदेव गुंड.
वाॅर्ड क्र २ - विमल दत्तात्रय खळदकर, विष्णू केशव खराडे.
वाॅर्ड क्र ३- चंद्रकांत बाबूराव खळदकर, शीतल सचिन शिंदे. वाॅर्ड क्र ४- मीना अरुण काळे , सचिन भीमराव शेलार, गणेश नारायण खराडे.
वाॅर्ड क्र ५- विकास पोपटराव खळदकर, स्वप्नाली विकास शेलार , स्वाती संभाजी आढागळे.
--
फोटो : केडगाव नानगाव ग्रामपंचायत
फोटो ओळी : नानगाव (ता.दौंड) येथे रासाई देवी मंदिरासमोर विजयी उमेदवारांचा जल्लोष.