केडगाव: नानगाव (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत रासाईदेवी परिवर्तन पॅनेलने १३ पैकी ८ जागा जिंकत सत्ता खेचून आणली आहे . या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी समर्थ पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी परिवर्तन केले आहे. रमेश थोरात समर्थक सत्ताधारी रासाईदेवी ग्रामविकास पॅनलला ५ जागांवर समाधान मानत पराभव स्वीकारावा लागला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास खळदकर (३० मतांनी) व त्यांचे सख्खे बंधू संदीप खळदकर हे (८० मतांंनी) दोघे सख्खे बंधू या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात दोन सख्खे भाऊ ग्रामपंचायतीचा एकावेळी ग्रामपंचायतीचा कारभार पाहताना दितील. तसेच माजी सरपंच सी. बी. खळदकर यांनीही १०० पेक्षा जास्त मतांनी खेचून आणली आहे. तर भीमा पाटसचे माजी संचालक डी. के. खळदकर यांच्या पत्नी विमल खळदकर यादेखील विजयी झाल्या आहेत.
दिग्गजामध्ये नानगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास भोसले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विशाल शेलार यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजय पॅनल चे नेतृत्व राजकुमार मोटे, अशोक खळदकर, आबासाहेब खळदकर, मनोहर गुंड यांनी केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
वार्ड क्र. १: संदीप पोपटराव खळदकर, भाग्यश्री दीपक खळदकर, आशा सुखदेव गुंड,
वार्ड क्र २विमल दत्तात्रय खळदकर, विष्णू केशव खराडे. वार्ड क्र ३: चंद्रकांत बाबुराव खळदकर, शितल सचिन शिंदे. वार्ड क्र ४: मीना अरुण काळे, सचिन भिमराव शेलार, गणेश नारायण खराडे.
वार्ड क्र ५ : विकास पोपटराव खळदकर, स्वप्नाली विकास शेलार, स्वाती संभाजी आढागळे.
१८ केडगाव नानगाव
नानगाव ता.दौंड येथे रासाई देवी मंदिरासमोर विजयी उमेदवारांचा जल्लोष.