सचिन ऊर्फ गुलटया सुभाष काळे ( वय २१), आकाश ऊर्फ गोटया सुभाष काळे (वय १९), साईल ऊर्फ नट्या सुधाकर भोसले (वय २०, सर्वजण रा. गणेगाव खालसा, ता. शिरुर), उमेश बलीकिरण यादव (वय १९), गोविंद हनुमान यादव (वय २१ दोघे रा. कोंढापुरी), करिमउल्ला अतिमल्ला मणियार (वय २१, सध्या रा. खंडाळे माथा, रांजणगाव गणपती) आणि आकरम यासीन रंगरेज (वय ५०, रा. शिक्रापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन काळे, आकाश काळे, साईल भोसले यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर चोरीसदंर्भात विचारणा केली, त्यावेळी त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ९ डीपी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार तारा खरेदी करणारे भंगार दुकानदार उमेश यादव, गोविंद यादव, करिमउल्ला मणियार, आकरम रंगरेज आदींना अटक केली.
नदीकाठचीे व शेतीजवळील विद्युत रोहित्र चोरी होण्याच्या तक्रारी मोठ्या वारंवार प्रमाणात येत होत्या. या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पोलीस पथके नेमून नुकतीच धडक कारवाई केली. या गुन्ह्यात ४२६ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व पट्या असे सुमारे २ लाख ९८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याकामी ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, या गुन्ह्यातील चार चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, शुभांगी कुटे, विनोद शिंदे आदी उपस्थित होते. ही कामगिरी पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, रघुनाथ हळनोर, वैज्जनाथ नागरगोजे व वैभव मोरे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार विजय सरजिने करीत आहेत.
--
फोटो क्रमांक : १८टाकळी हाजी पोलिस चोर
फोटो ओळ - रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरुर येथे विद्युत रोहित्र टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
180921\1839-img-20210918-wa0053.jpg
ट्रान्सफर चोरणारी टोळी जर बंद केल्यानंतर आरोपी सह पोलिस अधिकारी