त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:51 AM2018-10-21T01:51:50+5:302018-10-21T01:52:00+5:30

जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिवाजीराव काळे यांनी अल्पशिक्षित असताना जुन्नरसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले.

Transforming the Transplanting of Transplanted Plant - Ajit Pawar | त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर- अजित पवार

त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर- अजित पवार

Next

जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिवाजीराव काळे यांनी अल्पशिक्षित असताना जुन्नरसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे रूपांतर आता सर्वसुविधांयुक्त महाविद्यालयरूपी वटवृक्षात झाले आहे, असे गौरवोदर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या ‘सहकारमहर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे’ या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या डीएनए प्रयोगशाळेचे उद्घाटन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासो दांगट, दिलीप ढमढेरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके , जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, तात्यासाहेब गुंजाळ, संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती काळे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, अविनाश थोरात, सुभाष कवडे, अशोक काळे, अनिल जोगळेकर, प्राचार्य चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य संभाजी गायकवाड जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की दादासाहेब काळे यांची जुन्नर तालुक्यात चांगलीच राजकीय पकड होती. परंतु केवळ राजकारण न करता शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राची पायाभरणी केली. त्याचा प्रत्यय महाविद्यालयाची सर्व सुविधांयुक्त इमारत, अत्याधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्ता यातून येत आहे. विद्यमान अध्यक्ष संजय काळे चांगले काम करत आहेत असे सांगितले. पेट्रोल डिझेलचे भाव या सरकारने वाढवले. जुन्नर तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. धरणात पाणी असूनदेखील पाण्याचे नियोजन बिघडवून टाकले आहे. राज्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत या सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. जिल्हा परिषदेचा अधिकार आता पालकमंत्री यांना दिला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे अधिकार कमी केले आहेत, अशी टीका सरकारवर केली.
तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष संजय काळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, ‘तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणाºया शिवाजीराव काळे यांनी १९७० साली या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या वेळी संस्थेत १२९ विद्यार्थी शिकत होते,आता संस्थेत सहा हजार विद्यार्थी शिकत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत महाविद्यालय अग्रेसर आहे.’ आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘जुन्नर तालुका शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. शिवछत्रपती महाविद्यालय गुणवत्ता, सुविधा याबाबत आदर्श आहे. तालुक्यातील ९८ जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे.
>मान्यवरांकडून मदत जाहीर
आजोबा महादेवराव काळे यांच्या स्मरणार्थ वर्गखोल्या बांधण्यासाठी आर्थिक मदत जाहीर
अजित पवार यांनी महाविद्यालयासाठी मला एखादा मोठा प्रोजेक्ट सुचवा, कंपन्याचा सामाजिक निधी, खासदार निधी यातून निश्चित मदत करू,असे सांगितले.
आमदार शरद सोनवणे व उद्योगपती किशोर दांगट यांनी ५ लाख रुपये देणगी जाहीर केली.

Web Title: Transforming the Transplanting of Transplanted Plant - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.