पुणे : तृतीयपंथीयांच्या संबंधातलं सरकारने आणलेलं विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी पुण्यातील तृतीयपंथिंयांनी संभाजी उद्यानाजवळ आंदाेलन केले. यावेळी आज हाे या कल हाे समानता का राज हाे अशी घाेषणा देखील देण्यात आली.
ट्रान्सजेन्डर विधेयक 2018 नुसार तृतीयपंथीयांना देहविक्री करण्यास तसेच गुरु शिष्य परंपरा माणण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच त्यांनी रस्त्यावर भीक मागू नये असेही या विधेयकात म्हणण्यात आले आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विराेधात शहरातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत आंदाेलन केले. यावेळी हातात विविध घाेषणांचे फलक धरण्यात आले हाेते. तसेच या विधेयकाच्या प्रतीची हाेळी करण्यात आली. सरकाच्या विराेधात व विधेयकाच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या. या आंदाेलनात चांदणी गाेरे, साेनाली दळवी, सानिया शेख आदी उपस्थित हाेत्या.
सानिया शेख म्हणाल्या, ट्रान्सजेन्डर विधेयक हे आमच्यावर अन्याय करणारं विधेयक आहे. आम्ही या विधेयकाचा विराेध करताे. सरकारला वाटत असेल की आम्ही भीक मागू नये तर सरकारने आमच्यासाठी राेजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच या बिलामुळे जे म्हतारे आहेत त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण हाेईल.