पुणे : भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची अविरत प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. पुरेसे अनुवाद उपलब्ध नसल्याने प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मराठीच्या वाट्याला फारसे आलेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केली. मराठी समीक्षकांनी संकुचित विचार बाजूला ठेवून लेखकांचे मूल्यमापन करावे आणि वाचकांनी वाड.मयीन अभिरुची घडवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित १७ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी मिरजकर बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सरहदचे संस्थापक संजय नहार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आदी उपस्थित होते.मिरजकर म्हणाले, ‘संतसाहित्याचा समृध्द वारसा आपण पुनरुज्जीवित करायला हवा. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संतवाणीचा आवर्जून समावेश करायला हवा. संतसाहित्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला हवी. वैश्विक अनुभूतीचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे गरजेचे आहे. मराठी साहित्याच्या समृद्धीची जबाबदारी सर्वांची असून, शासन, साहित्यिक संस्था, लेखक, अनुवादक, समीक्षक, वाचक अशा सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.’मुजूमदार म्हणाले, ‘सर्व राज्ये, प्रांत एकमेकांच्या भगिनी असून, हे नाते जपण्यासाठी झपाटून काम करणाºया कार्यकर्त्यांची, साहित्यिकांची गरज आहे. साहित्यिकांमुळे सामान्य माणसाला वैैचारिक दिशा मिळते.
अनुवादक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:36 AM