श्रीराम पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात १६३ पतसंस्था उभारल्याने तालुक्यात एक सहकार चळवळ निर्माण झाली आहे. त्यामध्ये श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेने देखील समाजासाठी अनेक चांगले उपक्रम राबवून अन्य संस्थांना आदर्श घालून दिलेला असून, संस्थेचा कारभार पारदर्शक असून, प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे केले.
नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, अतुल बेनके जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, महादेव वाघ, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, देवराम लांडे, मोहित ढमाले, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत, संचालक शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासणे, विजय घोगरे, सीताराम पाटे, शीला मांडे, नवनाथ चौगुले, अमिर तांबोळी आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत हे संस्थेच्या कामाबद्दल माहिती देताना म्हणाले की, सभासद संख्या ७ हजार ९०६ असून ठेवी १३२ कोटी, नफा १ कोटी १४ लाख, भागभांडवल ५ कोटी २७ लाख आहे, संस्थेने सभासदांसाठी श्रीराम उत्सव मुदत ठेव योजना, कन्या ठेव योजना, लखपती ठेव योजना अशा प्रकारच्या अनेक योजना दि. ०१ सप्टेंबर २०२१ ते दिवाळीपर्यंत चालू केलेल्या आहेत.
सूत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी आभार मानले.
--
फोटो ओळी : ०८नारायणगाव श्रीराम पतसंस्था
फोटो ओळ : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पांडुरंग पवार, अमित बेनके, तानाजी डेरे, सुनील श्रीवत.
080921\010.jpg
श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले , यावेळी पांडुरंग पवार , अमित बेनके , तानाजी डेरे , सुनिल श्रीवत व इतर मान्यवर .