पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पीएमपी प्रशासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मद्तीने 'ट्रान्सपोर्ट फॉर ऑल' हा सर्व्हे करणार आहे. यात विद्यापीठाचे विद्यार्थी शहरातील विविध भागात फिरतील. लोकांशी संवाद साधतील. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिक कोणत्या साधनांचा वापर करतात, त्यात त्यांना कोणत्या अडचणी येतात किंवा जे नागरिक वाहतुकीसाठी सार्वजनिक साधनांचा वापर का करत नाही या कारणांचा शोध घेऊन त्याचा सविस्तर अहवाल पीएमपी प्रशासनला सादर करणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेविद्यार्थी १० दिवस फिरून नागरिकांशी संवाद साधून हा सर्व्हे करतील. येत्या काही दिवसातच सर्व्हेला सुरुवात होईल. सर्व्हे पूर्ण झाल्यावर त्याचा सविस्तर अहवाल पीएमपी प्रशासनाला सादर करतील. त्या नंतर पीएमपी प्रशासन सूचनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतिल त्रुटी दूर करून ती अधिक बळकट व्हावी या करीता हा सर्व्हे केला जाणार आहे.
पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना समूह अपघात विमा योजना
पीएमपीएमएलच्या १० हजार कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली आहे.ही योजना लागू झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे संरक्षण मिळणार आहे. ही योजना गट अ ते गट ड पर्यंतच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना लागू असणार आहे. पीएमटी कामगार संघ (इंटक)ने ही योजना लागू व्हावी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे संघाचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी सांगितले.