शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

परिवहन कार्यालय की ‘भंगार डेपो’

By admin | Published: June 17, 2016 5:20 AM

शहरातील वाहनांच्या संख्येने तब्बल ३१ लाखांचा आकडा ओलांडलेला. त्यामुळे वाहनांच्या परवान्यांपासून ते शिकाऊ परवान्यापर्यंत या ना त्या कामानिमित्ताने दररोज शेकडो पुणेकर संगमवाडी

पुणे : शहरातील वाहनांच्या संख्येने तब्बल ३१ लाखांचा आकडा ओलांडलेला. त्यामुळे वाहनांच्या परवान्यांपासून ते शिकाऊ परवान्यापर्यंत या ना त्या कामानिमित्ताने दररोज शेकडो पुणेकर संगमवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ये-जा करतात. मात्र, या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये आरटीओने कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांचा खच पडला असल्याने या ठिकाणी कामासाठी आलेल्या नागरिकांची वाहने मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी पार्किंगच नसल्याने अनेकांना स्वत:ची वाहने या कार्यालयापासून सुमारे १०० ते २०० मीटर लांब पार्क करूनच या कार्यालयाची पायरी चढावी लागत असून, अनेकदा रस्त्यावर लावलेल्या गाड्या पोलिसांकडून उचलल्या जात आहेत. त्यामुळे या कार्यालयात जाणे म्हणजे दुहेरी मनस्ताप असल्याची भावना पुणेकर व्यक्त करतात. संगमवाडी येथील आरटीओ कार्यालय सुमारे तीन एकर परिसरात विस्तारलेले आहे. त्यात प्रामुख्याने मुख्य प्रशासकीय इमारतीसह, शिकाऊ परवाना विभागाचे चाचणी केंद्र आहे, तर उर्वरित सर्व जागा रिकामी आहे. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची नोंदणी, वाहन परवाना, वाहन शुल्क, वाहन हस्तांतरण अशा एक ना अनेक कामांसाठी दररोज शेकडो पुणेकर सकाळी दहा ते दुपारी ३ पर्यंत येतात. त्यांच्या वाहनांची संख्या जवळपास तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करून देणे हे आरटीओ विभागाचे काम आहे. मात्र, या कार्यालयाच्या परिसरात असलेली रिकामी जागा कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या वाहनांनी व्यापली असल्याने या कार्यालयात दुचाकी पार्किंगसाठी जागाच नसल्याचे वास्तव आहे. त्यापेक्षाही वाईट अवस्था चारचाकी घेऊन येणाऱ्या व्यक्तींची आहेत. नागरिकांना वाहने कार्यालयाच्या आसपासच्या रस्त्यावर लावण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहात नसल्याचे दिसून येते. मोफत पार्किंग नाहीच...प्रत्यक्षात वाहनांसंबंधीचे कोणतेही काम करताना, नियमानुसार, काही काही स्वरूपात नागरिकांना शुल्क भरावेच लागते. त्यामुळे एखादे वाहन घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती किमान पाच हजार रुपयांचा कर भरतेच. त्यामुळे अशा वेळी या कार्यालयात असलेली पार्किंग मोफत असावे अशी सर्वसामान्यांची माफक अपेक्षा असते.मात्र, या कार्यालयातील सर्व जागा पे अँड पार्किंगसाठी ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सोडण्यासाठी आत मध्ये गेले तरी बाहेर येण्यासाठी पार्किंग शुल्क मोजावेच लागते. आतमध्ये गाडीचे नुकसान झाले अथवा ती चोरीला गेली तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. मात्र, पार्किंगची वसुली नियमितपणे सुरूच असते.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरया कार्यालयात मोठया प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यातच अस्ताव्यस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे तसेच या ठिकाणी येत असलेल्या वाहनांची तपासणी होत नसल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात या कार्यालयात आलेल्या गाड्यांची तपासणी करणे, त्यांचे नोंदणी क्रमांक ठेवणे अशा कोणत्याही उपाय योजना प्रशासनाकडून केलेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक जण आतमध्ये गाडी लावून संपूर्ण शहर फिरूण येऊन पुन्हा गाडी घेऊन जाताना दिसतात. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागरिकांची वाहने रस्त्यावरया ठिकाणी येणारे नागरिक वाहनांसंबधी कामांसाठी येत असले तरी, त्यांना स्वत:चे वाहन लावण्यासाठी या ठिकाणी जागा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव मंगळवारपेठ, संगमवाडी घाट, कैलास स्मशानभूमी येथील मैदान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर जागा मिळेल तिथे दुचाकी पार्क करावी लागते. त्यानंतर चालत जाऊन कार्यालयातील काम उरकून पुन्हा गाडी घेण्यासाठी यावे लागले. अशा वेळी अनेकदा रस्त्यावर लावलेले वाहन नो पार्किंगमध्ये असल्याने त्याचा दंडही पुन्हा नागरिकांनाच भरावा लागतो. या शिवाय पोलीस ठाण्यांची हद्द माहीत नसल्याने नेमकी कोणत्या पोलिसांनी गाडी उचलून नेली याचा शोध घेता घेता नागरिकांची पुरती दमछाकही होते.पार्किंगचा गैरवापरया कार्यालयातील पार्किंगचाही मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसतो. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पुरेसे पार्किंग नसल्याने अनेकदा रेल्वे प्रवासी या पार्किंगमध्ये आपली वाहने दहा-दहा दिवस लावतात. त्यानंतर परत घेऊन एका तासाचे शुल्क भरून आपली वाहने घेऊन जातात. त्यामुळे काही वेळाच्या कालावधीसाठी आलेल्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे हा गैरवापर थांबविण्याची मागणीही होत आहे. कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेता, सध्याची जागा कमी पडत आहे. त्यामुळे सध्या कारवाई करून ठेवलेल्या गाड्यांचा लवकरच लिलाव केला जाणार असून, या परिसरातील रिकाम्या जागेचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यानंतर कार्यालयाच्या खालील जागा दुचाकींसाठी तर नवीन जागा चारचाकींसाठी असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंगची जागाही उपलब्ध होईल.- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारीभंगार गाड्यांचा खचया कार्यालयाकडून रिक्षा, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची आखणी करून ठेवलेली आहे. मात्र, त्या ठिकाणी आरटीओने कारवाई करून आणलेल्या गाड्यांचा खच पडलेला आहे. यातील अनेक गाड्या गंजलेल्या असून, वर्षानुवर्षे त्या एकाच ठिकाणी जागा अडवून उभ्या आहेत. त्यामुळे त्या जागी इतर वाहनांसाठी जागा उपलब्ध होताना दिसत नाही.ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आखून दिली आहे, त्या ठिकाणीही वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी गाड्या या ठिकाणी उभ्या असतात.