शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

आकर्षक वाहन क्रमांकातून परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयाची २७ कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:39 PM

आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत.

ठळक मुद्देयावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांत विभागातून ३६ हजार चालकांनी घेतला आकर्षक क्रमांक वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला

पुणे : आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत. तर सात जणांनी सरासरी प्रत्येकी चार लाख रुपये दिले आहेत. परिवहन विभागाकडून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी काही आकर्षक क्रमांक राखून ठेवले जातात. यामध्ये १, १००, ७८६, ४१४१ अशा विविध क्रमांकाचा समावेश असतो. प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) या क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यानुसार लिलाव पध्दतीने हे क्रमांक संबंधित वाहनासाठी दिले जातात. त्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत बोली लावता येवू शकते. मागील आर्थिक वर्षामध्ये पुणे विभागाला या लिलावातून तब्बल ३७ कोटी ३० लाख रुपयांची कमाई झाली होती. तर यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत विभागातून सुमारे ३६ हजार चालकांनी आकर्षक क्रमांक घेतला आहे. यातून २७ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे. पुणे विभागांतर्गत आरटीओ पुणे, उप प्रादेशिक परिवहन कार्यलय सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि अकलुज या कार्यालयांचा समावेश होतो. वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला दिली जाते. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक लागतो. एका क्रमांकासाठी चार लाख रुपये मोजणारे हौशी वाहनचालकही वाढू लागले आहेत. मागील आठ महिन्यांत सात चालकांनी सुमारे प्रत्येकी चार लाख रुपये मोजले आहेत. तर एक लाखांहून अधिक रक्कम मोजणाºयांची संख्या १२९ एवढी आहे. यातून पुणे विभागाला सुमारे २ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरटीओला यातून मिळणाºया उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्षातील अद्याप चार महिने बाकी असल्याने यंदा नवीन नोंदणीतून मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. 

आठ महिन्यांतील कार्यालय निहाय नोंदणी व उत्पन्न : 

कार्यालय             नोंदणी संख्या   उत्पन्नपुणे                      २१४८६              १५ कोटी ६९ लाखसोलापूर               २५९८                १ कोटी ७३ लाखपिंपरी चिंचवड     ९३९३                 ७ कोटी ८६ लाखबारामती              २२८२                १ कोटी ७८ लाखअकलुज               २३४                  १२ लाख----------------------------------------------------------एकूण                  ३५९९३                २७ कोटी १७ लाख----------------------------------------------------------

शुल्कनिहाय वाहन नोंदणीशुल्क                                      नोंदणी५ हजारापर्यंत                           २५६६०        ५०००१ ते ७५००                        ५४६९७५०१ ते १०,०००                       ६२११०,००१ ते २०,०००                    १९११२०,००१ ते ५०,००१                    २१११५०,००१ ते १,०००००                  ९२१,००००१ ते २,५०,०००              १२२२,५०,००१ व त्यापुढे                  ७ 

टॅग्स :pune rtoपुणे आरटीओPuneपुणे