महेश जगताप / सोमेश्वरनगरऊसतोडणी कामगारही आता काळानुसार बदलत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. पिढ्यान्पिढ्या बैलांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या उसाच्या वाहतुकीला आता फाटा देऊ लागलेत. स्वत:च्या मालकीच्या ट्रक्टरला दोन दोन गाड्या अथवा डंपिंग जोडून उसाची वाहतूक करायची असा नवीन फंडा शोधून काढला आहे. ट्रॅक्टरला जोडलेली उसाची गाडी असे चित्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही वर्षांत बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काही वर्षांतच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीस शंभर वर्षे पूर्ण होतील. तेव्हापासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातून बैलगाडीद्वारे कारखान्यांपर्यंत उसाची वाहतूक केली जात आहे. त्यानंतर ९०च्या दशकानंतर बैलगाडीच्या ऊसवाहतुकीला ट्रक व ट्रॅक्टरने हातभार दिला, मात्र पूर्ण वाहतूक याने होऊ शकली नाही. त्याला बैलगाडीचा आधार घ्यावाच लागला.बीड, उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातून व कर्नाटक राज्यातूनही येणारे ऊसतोड कामगारांची परिस्थिती कायमच हलाखीची असते. परिस्थितीअभावी हे कामगार ट्रक अथवा ट्रॅक्टर घेऊ शकत नाहीत. गावाकडे पाण्याची व खाण्याची नेहमीच बोंब म्हणून मुकादमाकडून उचल घ्यायची. त्यातच दोन बैल खरेदी करायचे व उरलेल्या रकमेतून घरातील लग्न, मुलांच्या शाळा भागवयाच्या व शेकडो किलोमीटरवरून येऊन उसाचे पाचट कापेपर्यंत राबराब राबायचे. रोज उसाचे वाढे विकून मिळणाऱ्या पैशांतून रोजचा प्रपंच्याचा खर्च भागवयाचा व ऊसवाहतुकीच्या पैशांतून मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची. हा ऊसतोडणी कामगारांचा रोजचाच कार्यक्रम. हंगाम संपला, की तेच बैल विकायचे आणि त्याचे पैसे जपून ठेवून पुढच्या वर्षी पुन्हा नवीन बैलजोडी खरेदी करायची असा दरवर्षीचा कार्यक्रम.स्वत:च्या मुलांच्या पोटासाठी ऊसतोडणी कामगार बैलांना मारत असला, तरी तो बायका-मुलांबरोबर बैलांवरही तेवढेच प्रेम करतो. चालू हंगामात एखादा बैल दगावल्यास ऊसतोडणी कामगारांचा संपूर्ण ऊसतोडणी हंगामच वाया जातो. आणि नवीन बैल खरेदीसाठी त्याकडे ५० ते ६० हजार रुपये उपलब्ध नसल्याने उचल फेडायची कशी, असाही प्रश्न ऊसतोडणी कामागरांना पडतो. मात्र, आता हे सगळ्या अडचणी येतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऊसतोडणी कामागर बैलांना फाटा देऊन आता ट्रॅक्टरकडे वळले आहेत. स्वत:चा छोटा अथवा मोठा ट्रॅक्टर घेऊन यायचे, कारखान्याकडून बैलगाडी घ्यायची अथवा स्वत:चे डंपिंग आणायचे आणि उसाची वाहतूक करायची हा नवीन फंडा शोधून काढला आहे. सोमेश्वरनगर : सहा वर्षांपासून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ऊसतोडणी कामागरांच्या मुलांसाठी ‘प्रगत शिक्षण संस्थे’ने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामागरांची मुले आता शिक्षणाचे धडे गिरवताना दिसणार आहेत. याचा शुभारंभ प्रगत शिक्षण संस्थेने सोमेश्वर कारखान्यावरून केला आहे. ४एकही मूल शाळेबाहेर राहू नये, असा नवीन कायद्याचा दंडक आहे. तसे झाल्यास त्या परिसरातील संबंधित शाळेचा शिक्षण, संबंधित ग्रामपंचायत व शिक्षण विभाग यांना दोषी धरले जाणार आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांत वरील कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा यामध्ये हस्तक्षेप करून साखर शाळांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे जाणकरांचे मत होते.
उसाची वाहतूक होणार आता ट्रॅक्टरगाडीतून
By admin | Published: November 15, 2016 3:24 AM