आव्हाळवाडी : मांजरी खुर्द येथील खैराड वस्तीत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यांत सावजच ठेवले नसल्याने बिबट्या शेतकऱ्यांना चकवा देऊन जात असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने तब्बल आठ दिवस पिंजरा लावूनही पिंजऱ्यात सावज नसल्याने मांजरी येथे बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा म्हणजे ‘वास्तुसंग्रहालयातील पिंजरा’ असल्याचे शेतकरी रामचंद्र उंद्रे, जयवंत उंद्रे, नाथाभाऊ उंद्रे, संजय साळुंके, राजेंद्र साळुंके, योगेश उंद्रे या परिसरातील शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.उन्हाचा कडाका लागत असून दुपारी काम होत नाही. सकाळ संध्याकाळ बिबट्याची दहशत असून शेतीची कामे करता येत नाही. त्यात विहिरीला पाणी कमी होत आहे. लाईट नसल्याने पिके सुकून चालली आहेत. मांजरी गावचे पोलीस पाटील अंकुश उंद्रे, शेतकरी संजय साळुंके, योगेश उंद्रे,भगवान गिरी यांच्या सहकार्याने दोनच दिवस सावज म्हणून (शेळी/बकरी) ठेवली होती. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयच नसल्याने शेतात बिबट्या पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा सावज न ठेवल्याने फक्त परिसरातील शेतकऱ्यांना पिंजरा असून अडचण नसून खोळंबा असे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या बाबत हवेली वन क्षेत्रपाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, मांजरी येथे पिंजऱ्यात दररोज सावज ठेवत असल्याचे वन कर्मचारी व अधिकारी सांगत असल्याचे सांगितले. पण मांजरी परिसरात पिंजरा लावल्यानंतर फक्त दोन दिवसस कर्मचारी आले, परत ते फिरकलेच नाहीत, असे वरील शेतकरी ठामपणे सांगत आहेत.यवत : येथील गाडगीळवस्ती व माटोबा तलावाच्या परिसरात दोन ते तीन महिन्यांनंतर परत एकदा बिबट्या आढळून आल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील तीन दिवसांत दोन वेळा बिबट्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी दिसला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास दोरगे यांना तीन दिवसांपूर्वी बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसला होता. तर काल रात्री शेतकरी अवचट यांना बिबट्या दिसून आला. मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी असेच बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते, तर काही पाळीव जानवरे व कुत्रीदेखील बिबट्याने मारली होती. मात्र जूना कालवा व ब्रिटिशकालीन माटोबा तलाव या परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्या उसातून लपून पळ काढत असल्याने वन विभागाला बिबट्या सापडला अथवा दिसला नव्हता. काही दिवस बिबट्या न दिसल्याने कदाचित तो दुसऱ्या ठिकाणी गेला असेल, असे नागरिकांना वाटल्याने शेतकरी निर्धास्त झाले होते. तीन महिन्यांनंतर आता परत बिबट्याचे दर्शन झाल्याने परत एकदा धास्तावला आहे.
पिंजरा लावला; सावज कुठयं?
By admin | Published: May 01, 2017 2:21 AM