शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Published: July 04, 2017 4:26 AM

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून रामवाडी (हडपसर) येथे कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून रामवाडी (हडपसर) येथे कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे, मात्र त्याला तीव्र विरोध सुरू असून, त्यासाठी परिसरातील भाजपा वगळता सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते एकत्र झाले आहेत. कचऱ्याची एकही गाडी इथे येऊ देणार नाही, असा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला.महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच योगेश ससाणे व अन्य नगरसेवकांनी याबाबत बोलताना सांगितले, की नागरिकांच्या आरोग्याचा काहीही विचार न करता, त्यांना विश्वासात न घेताच भाजपाने हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने येथे महापालिकेच्याच एका प्रकल्पाला मनाई केली आहे. त्यामुळे तो प्रकल्प बंद करावा लागला आहे. त्याचा विचार न करता आता पुन्हा दुसरा तसाच प्रकल्प माथी मारला जात आहे. शिवसेना नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनीही या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. शहरातला सगळा कचरा हडपसरमध्ये आणण्याचा चंगच महापालिकेने बांधला असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसनेही या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.रामटेकडी येथे महापालिकेची १३ एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेवर कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने परवानगी दिली असल्यामुळे महापालिकेने तिथे ७०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया होईल असा प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. त्याचे भूमिपूजन पुढील आठवड्यात होत आहे. ते होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला विरोध सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशी एकही गोष्ट आम्ही करू देणार नाही, असे ते म्हणाले.शहरात दुसरीकडे जागा शोधावीभाजपाचे स्थानिक नगरसेवक सत्तेमुळे मूग गिळून बसले असतील, मात्र आम्हाला आमच्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. फुरसुंगी, उरुळी यांचे काय झाले ते डोळ्यांसमोर आहे. एकदा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिका काहीही करणार नाही, आता त्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांनी शहरात दुसरीकडे कुठेही जागा शोधावी, तिथे प्रकल्प सुरू करावा, हडपसर परिसरात आता असे काहीही करू देणार नाही, असा निर्धार या पक्षांच्या नगरसेवकांनी व्यक्त केला. शहरातील सर्व कचरा जमा करायचा व हडपसरमध्ये आणून टाकायचा हे आम्ही किती दिवस व का सहन करायचे? इथे चांगली विकासकामे केली जात नाहीत, जनहिताचे असे काहीही होत नाही. साध्या नागरी सुविधांही दिल्या जात नाहीत. आता मात्र असे चालणार नाही. कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प सुरू करू देणार नाही.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, महापालिका