पिंपरी : दोन महिने उलटूनही न मिळालेले वेतन त्वरित मिळावे या मागणीसाठी कचरावेचक महिलांनी गुरुवारी महापालिका भवनात ठिय्या मांडला. महापालिकेच्या विविध प्रभागातील कचरा गोळा करण्याचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांमार्फत सुरू आहे. २४ जुलैपासून किमान वेतनाप्रमाणे ठेका सुरू झाला आहे. २४ जुलै ते ३१ आॅगस्टपर्यंतचे वेतन कचरावेचकांना अद्यापही मिळालेले नाही. याबाबत कागद-काच-पत्रा-कष्टकरी पंचायतीच्या वतीने आयुक्तांसह प्रभाग अधिकारी यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. तरीही वेतन मिळालेले नाही. (प्रतिनिधी)
कचरावेचक महिलांचा महापालिकेत ठिय्या
By admin | Published: September 25, 2015 1:01 AM