लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : अलिबाग येथून तीर्थयात्रेसाठी भाविकांना घेऊन पंढरपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हलची बस, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणगावच्या पुलावर पलटी होऊन झालेल्या अपघातात अठरा जण जखमी झाले. रविवारी (दि. १६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी अकलूज येथे हलवण्यात आले आहे. इतरांवर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.गौरी गिरीष पाटील (वय २८),सुनीता सुधाकर पाटील (वय५२), मैथिली मोहन पाटील (वय १६), योगिता शिरीष पाटील (वय ३६), प्रकाश बळीराम किणी (वय ४०), रामकृष्ण बाळ भाटकर (वय३८), मंदार भास्कर पाटील (वर२८), सुषमा महेंद्र पाटील (वय ४0), प्रदीप किणी(वय ४५), महेंद्र प्रभाकर पाटील(वय ४६),सुधाकर पाटील(वय६), प्रणिता किणी (वय१७), अथर्व महेंद्र पाटील (वय१०), प्रचिती प्रकाश किणी (वय१५), अर्चना प्रकाश किणी (वय३५), काका पाटील, वृषभ बाळकृष्ण भाटकर (वय३७),अल्पेश भास्कर पाटील (वय २७) सर्व रा. अलिबाग, जि.रायगड) अशी जखमींची नावे आहेत.या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अलिबाग येथील पाटील कुटुंबीय तीर्थयात्रेसाठी खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने ( एमएच ०४ जी ४६३३) पंढरपूरकडे निघाले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल हिंगणगाव पुलाजवळ आली. त्यावेळी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीने दोन चार पलट्या खाल्या. ती रस्त्याच्या दुस-या बाजूला जाऊन पडली. ती ज्या ठिकाणी पलटी होऊन थांबली. त्या ठिकाणी अगदी दोन फुट अंतरावर वीस फुट खोल खड्डा होता. सुदैवाने गाडी थांबल्याने जीवितहानी झाली नाही. गाडीतच स्वयंपाकाचा सिलिंडर होता. तो अपघातानंतर बाजूला पडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पुणे-सोलापूर मार्गावर ट्रॅव्हल्स उलटली
By admin | Published: July 17, 2017 3:47 AM