लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या खाजगी कोविड हॉस्पिटलमधील फिजिशियन डॉक्टर तसेच इतर डॉक्टरांची नियुक्ती मेडिकल प्रोटोकॉल नुसार आहे किंवा कसे याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने सोमवारी काढले. काही बोगस पदव्या असणारे डॉक्टर्स तसेच एकच तज्ञ डॉक्टर च्या नेतृत्वाखाली अनेक हॉस्पिटल्स उभी केली जात असल्याने जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात सध्या कोविड हॉस्पिटल आणि समर्पित कोविड हॉस्पिटल मोठ्या संख्येने सुरू केली जात आहेत. अनेक ठिकाणी काही हॉटेलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून उपचार केले जात आहे. मात्र अशी हॉस्पिटल सुधारण्यासाठी तेथे असणाऱ्या सुविधा आणि सुविधांच्या निकषावर फिजिशियन डॉक्टर्स इतर तज्ञ डॉक्टर यांच्या नेमणुका केल्या आहेत किंवा कसे याची पडताळणी केली जाणार आहे.
कोरोना हॉस्पिटल च्या नावाखाली काही ठिकाणी एकाच फिजिशियन डॉक्टर च्या नावे तीन ते चार ठिकाणी हॉस्पिटल चालवली जातात. अशा तक्रारी जिल्हा परिषदेकडे आले आहेत. तसेच ग्रामीण भागात दोन बोगस डॉक्टरांनी हॉस्पिटल्स चालविली असल्याचे प्रकार देखील उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज कोबी हॉस्पिटल कोबी समर्पित हॉस्पिटल या ठिकाणी असणारे डॉक्टर त्यांच्या नेमणुका त्यांची वैद्यकीय पदवी यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने दिले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी सोमवारी तातडीने जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारी खाजगी कोबी हॉस्पिटल स्कॉड समर्पित हॉस्पिटल्स तेथे उपलब्ध असणारे डॉक्टर फिजिशियन तज्ञ यांची संपूर्ण माहिती संकलित करून तत्काळ अहवाल पाठविण्याचे आदेश जारी केले.