शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

वृक्षगणनेत एका झाडाला २२ रुपये ७० पैसे..!

By admin | Published: February 28, 2016 3:49 AM

शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादे झाड, ते किती वर्षाचे आहे, रोज किती कार्बन शोषून ते पर्यावरणाला मदत करते, त्याचे आयुष्य किती, सध्याची अवस्था काय आहे, या

पुणे : शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादे झाड, ते किती वर्षाचे आहे, रोज किती कार्बन शोषून ते पर्यावरणाला मदत करते, त्याचे आयुष्य किती, सध्याची अवस्था काय आहे, या महत्त्वाच्या माहितीबरोबरच ते कुठे आहे, त्याचे शास्त्रीय, प्रचारातील नाव, अशी साधी माहितीही आता केवळ एका क्लिकसरशी मिळणार आहे. शहरातील सर्व वृक्षांच्या अशा अत्याधुनिक गणनेसाठी पालिकेच्या स्थायी समितीने तब्बल ९ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. पडलेल्या, पाडलेल्या, तसेच नव्याने लावलेल्या वृक्षांची माहितीही यात अपडेट होत राहणार आहे.स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती दिली. शहरातील वृक्षांची दर ५ वर्षांनी गणना करणे पालिकेवर बंधनकारक आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये अशी गणना झाली होती. मात्र, ती साधी होती. नव्या अत्याधुनिक पद्धतीने गणना व्हावी, यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली होती. तीन कंपन्यांनी निविदा दाखल कल्या. त्यातील सार आयटी या कंपनीची निविदा सर्वांत कमी म्हणजे एका वृक्षासाठी २२ रुपये ७० पैसे या दराची होती. या निविदेला मंजुरी दिली असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यांच्या गणनेनंतर शहरातील कोणत्याही वृक्षासंबधी एकूण २० ते २२ प्रकारची माहिती पालिकेकडे जमा होणार आहे. २ वर्षांत त्यांचे काम पूर्ण होणार असले, तरी करार पुढची जनगणना होईपर्यंत, असा केला जाणार आहे.पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की एका वृक्षासाठी ही रक्कम जास्त वाटत असली, तरीही त्यांच्याकडून जमा करण्यात येणारी माहिती पाहता ती कमीच आहे. या नव्या वृक्षगणनेत प्रत्येक वृक्षाचे त्या परिसराच्या नकाशावर अक्षांश-रेखाशांसह स्थान दिसेल, पर्यावरणसंरक्षणात त्याची उपयुक्तता किती टक्के, तो फुलतो कधी, त्याला फळे केधी येतात, तेही सांगता येईल. साधारण १० सेंटीमीटर व्यासाचे खोड असलेले, ३ मीटर उंची असलेले, पालिका हद्दीतील सरकारी, खासगी, सार्वजनिक अशा कोणत्याही जागेवरील प्रत्येक झाडाची यात नोंद होणार आहे. येत्या महिनाभरात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कंपनीचे काम सुरू होईल, असे घोरपडे यांनी सांगितले आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक वृक्षगणना करणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका आहे, अशी माहिती घोरपडे यांनी दिली. पुण्यातील प्रत्येक वृक्षाची सर्व प्रकारची माहिती यामुळे पालिकेकडे जमा होणार असून, त्यातून कोणत्या प्रभागात झाडे लावण्याची गरज आहे, कोणती झाडे लावण्याची गरज आहे, ते समजणार आहे.