पुणे : बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. मुंबईसह पुणे आणि मोठ्या शहरांमधील बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या, व्यावसायिक यांनी प्लॅन मंजूर करताना येथील जागेतील झाडे तोडण्याची परवानगी मागितली जाते. ही परवानगी देताना एकास तीन अशी झाडे अन्यत्र मोकळ्या जागेत लावण्याची अट घातली जाते. अशा व्यावसायिक आणि बिल्डरांच्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दोषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. पुण्यातील मुठा नदीची पाहणी करून अहवाल द्यापुण्यातील मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडण्यात येत असून नदी पात्रात अतिक्रमणे वाढली आहेत. डीपी रस्त्यावर मंगल कार्यालये, लॉन्स आणि हांटेल्स वाढली आहेत. त्यांच्यासह कारवाई करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.
बिल्डर्स, कंपन्या, व्यावयायिकांच्या वृक्ष लागवडीचे होणार आॅडिट; रामदास कदम यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:05 PM
बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
ठळक मुद्देव्यावसायिक, बिल्डरांच्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडिट करुन करावा लागणार अहवालदोषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून केली जाणार कायदेशीर कारवाई