यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्य अधिकारी रामराजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पेरू, आंबा, लिंबू, रामफळ, सीताफळ, चिंच, कवट, गुलाब, मोगरा व इतर आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. सध्याची कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता, अनावश्यक खर्च टाळून कर्मचाऱ्यांनी पंधरा हजार रुपये जमा करून, सदर वृक्षांची लागवड केली. त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच केक कापून वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला.
तसेच ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झालेले पाणीपुरवठा पर्यवेक्षक सहदेव व्यवहारे, अशोक शहा, आशा चव्हाण यांनी आपल्या सेवापूर्ती निमित्ताने वृक्षारोपण केले. तत्पूर्वी सरस्वतीनगर येथील पाण्याची टाकी येथे, इंदापूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने त्यांनी मागील दोन वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षास द्वितीय वर्धापनदिनानिमित्त वृक्षाचा सुद्धा वाढदिवस साजरा केला. तेथे नव्याने गुलाब व मोगरा या फुलवृक्षांचे २५ रोपे लावण्यात आली. यावेळी सभा अधीक्षक गजानन पुंडे, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, नोडल ऑफिसर गोरक्षनाथ वायाळ, सतीश तारगावकर, आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, सहायक आरोग्य निरीक्षक सुनील लोहिरे, अविनाश बर्गे, मुकादम दत्तात्रय ढावरे व आदी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०२ इंदापूर वृक्षारोपण
इंदापूर नगरपरिषदेच्या बायोडायव्हर्सिटी उद्यानात वृक्षारोपण करताना अधिकारी व कर्मचारी.