याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन रामदास गिलबिले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव के. के. निकम, नगरसेवक दिनेश घुले, भाजप आळंदी शहराध्यक्ष भागवत आवटे, सुरेश तापकीर, रामकिसन भाळे, अमृता भिसे, गणेश शेळके, गिरीश काटे, राम कांबळे, विक्रम माळवे, सदाशिव पवार, बाप्पूसाहेब गाडेकर, वासुदेव देशमुख, विष्णू सुतार, सुधाकर जायभाय, राकेश सिंग, आप्पा शेखर, नवनाथ आंधळे, संतोष वायाळ, अमोल मुंडे, कृष्णा पालवे, दत्ता शेवाळे, पांडुरंग भिसे, ओंकार इंगळे, पांडुरंग कोळेकर, राजू ठाकरे, संतोष तोत्रे, श्याम ठाकर आदी नागरिक उपस्थित होते. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे काळाची गरज आहे. यासाठी शहरात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत के. के. निकम यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदीतील तापकीरनगर व इंद्रायणीनगर परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवर.