राजुरी : बोरी बुद्रुक येथील खांडसरी कारखान्याजवळील राजुरी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वनक्षेत्रामध्ये अनधिकृत अतिक्रमण तसेच वृक्षांची बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीची जागा गावातील खांडसरी कारखान्याजवळील राजुरी रस्त्याच्या कडेला आहे. जागा ग्रामपंचायतीने वन विभागाकडे वृक्ष लागवड करण्यासाठी दिलेली आहे. सध्या या वनातील क्षेत्रामधील झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहे. वन विभागाला या बाबतची सूचना देऊनही वन विभाग कारवाई करण्यास उदासीन आहे. या जागेवर काही लोकांनी झाडे तोडून ती जागा सपाट करून झोपड्या बांधायला सुरुवात केली आहे.वन विभागाने या होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई न केल्यास लवकर ही कारवाई करावी, अन्यथा ग्रामपंचायतीला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, वन व्यवस्थापन समितीमार्फत औषधी वनस्पती उद्घाटन किंवा निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे, असे पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले (वार्ताहर)
बोरी बुद्रुक वनक्षेत्रात वृक्षतोड
By admin | Published: December 26, 2014 11:16 PM