तळेघर: आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच जोडव्यवसाय म्हणून आधुनिक पद्धतीचे पशुपालन हा व्यवसाय करुन धवल क्रांतीकडे वाटचाल करत भागाचा विकास करावा, असे मत आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती आंबेगाव व ग्रामपंचायत फलोदे यांच्या संयुक्त विद्यमाने शरदचंद्रजी पवार ग्रामसमृद्धी योजना सन २०२१ अंर्तगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामरोजगार हमी योजनेतून मनरेगा ग्रामसमृद्धी अंर्तगत फलोदे येथील आदिवासी शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधकाम करण्याचा कार्यक्रम पार पडला. गोठ्यांचे भूमिपूजन आदिवासी जनतेचे नेते माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गवारी बोलत होते. यावेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे,पंचायत समिती उपसभापती संतोष भोर, माजी सभापती नंदकुमार सोनावले, माजी सभापती प्रकाश घोलप, सहायक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, तांञिक अधिकारी ओमकार नांगरे, रोजगार हमी योजना अधिकारी पुष्पलता डोके, फलोदे गावच्या सरपंच मनिषा मेमाणे, उपसरपंच मनोहर मेमाणे, पिंपरी सरपंच संगिता वडेकर, माजी सरपंच गणपत मेमाणे, ग्रामविकास अधिकारी मंगेश जोशी आदी उपस्थित होते.
संजय गवारी म्हणाले, आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वैयक्तिक लाभाच्याही काही योजना असून त्याचा आदिवासींनी लाभ घ्यावा. विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा व आपल्या भागाचा विकास साधावा.
शरदचंद्रजी पवार ग्रामसमृद्धी योजना सन २०२१ अंर्तगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामरोजगार हमी योजनेतुन मनरेगा ग्रामसमृद्धी ह्या योजनेसाठी शासनाकडुन एका लाभार्थ्यास ७४ हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते. फलोदे व सावरली ग्रुप ग्रामपंचायतीमधील २१ लाभार्थ्यांना जनावरांचा गोठा बांधकाम करण्याचा आदेश वितरित करण्यात आले.
१२तळेघर
आदिवासी शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधकाम करण्याचा आदेश वितरण समारंभ पार पडला.