शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ताडपत्री चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

By admin | Published: June 22, 2017 7:23 AM

आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री या भेटवस्तू खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्थायी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री या भेटवस्तू खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत झाला. खरेदीत दिरंगाई का झाली, वेळापत्रक का तयार केले नाही, सबव्हाऊचर तपासणी, रसायन शाळेचा तपासणी अहवाल सादर झाल्यानंतरच ठेकेदाराला रक्कम अदा करावी, जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहेत. महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीसोहळा आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यात येते. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण गाजले होते. त्यानंतर भाजपाची सत्ता आल्यानंतरही ताडपत्रीखरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण उघड झाले. बाजारात दोन हजार चारशे रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देणाऱ्या भाजपाने तीन हजार चारशे बारा रुपयांना खरेदी केली असून, साडेसहाशे ताडपत्री खरेदी केली होती. त्यासाठी वाढीव दरानुसार २२ लाख सजरा हजार आठशे रुपये खर्च अपेक्षित होता. तर, बाजारभावानुसार दोन हजार चारशे रुपये दर अपेक्षित धरल्यास सुमारे पंधरा लाख साठ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये सुमारे सहा लाख साठ हजारांचा आरोप झाला होता. याबाबत लोकमतनेही स्टिंग आॅपरेशन करून वाढीव दराने ताडपत्री खरेदी झाल्याचे निदर्शनास आणले होते. ताडपत्री खरेदी २५ लाखांच्या आत असल्यामुळे पालिका आयुक्तांच्या अधिकारात केली. त्यामुळे ताडपत्री खरेदीचा विषय माहितीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला होता. यावर समितीनेही या प्रकरणाबाबत प्रशासनास प्रश्न विचारले. ताडपत्री खरेदी प्रकरणाची सविस्तर चौकशी झाल्याशिवाय संबंधित पुरवठादारास त्याचे देयक देऊ नयेत, अशा सूचना स्थायी समितीने दिल्या. याबाबत बोलताना अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय झाला. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, लेखाप्रमुख राजेश लांडे, दक्षता समितीचे सतीश इंगळे यांची त्रिसदस्यीय समिती ताडपत्री घोटाळ्याची चौकशी करणार आहे. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. त्रिसदस्यीय समिती ताडपत्रीच्या बिलाची पडताळणी करणार आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब का झाला, याची सविस्तर चौकशी करणार आहे. महिन्याभरात समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. व्हॅट व्हेरिफिकेशनबाबतही माहिती घेण्यात येणार आहे. तसेच ताडपत्रीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविले आहेत.’’दिरंगाईचीही चौकशी १८ एप्रिलला महापौर नितीन काळजे यांनी पालखीसोहळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. त्या वेळी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी उत्सव-महोत्सव हे दर वर्षीच येत असतात. त्यामुळे त्याचे कॅलेंडर करावे, तसेच वारकऱ्यांना कोणती वस्तू द्यायची याबाबत नियोजन झाले होते. त्यानंतर २६ मे प्रशासनाने उशिरा निविदा काढण्यातील गौडबंगाल काय, याची चौकशी करण्यात येणार आहे. विलंबाचे कारणही शोधले जाणार आहे.