पुणे : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधांसाठी नेहमीच आंदोलन करावे लागत असून, सरकार वसतिगृहच मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. विद्यार्थ्यांना भोजन न पुरवता डीबीटीप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे भरणार असल्याने आधीच सरकारचे कोणतेच पैसे वेळेत मिळण्याविषयी ओरड असताना आता पुन्हा न्व्याने घाट नक्की कशासाठी घालण्यात आला आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांकडून एल्गार पुकारण्यात येणार आहे. वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्वाचा निषेध म्हणून पुणे ते नाशिक पायी मोर्चा (लॉंगमार्च) आजपासून सुरू केला आहे. आदिवासी विद्यार्थी आक्रोश मोर्चा असे या आंदोलनाला नाव दिले आहे. १८तारखेला हा मोर्चा नाशिक येथे पोहचणार असून त्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मात्र, सरकारला विद्यार्थ्याबद्दल थोडी तरी सहानुभूती असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा हाच मोर्चा अधिवेशनाकडे वळविण्यात येईल असा इशारा दिला आहे. राज्यातील मुले आणि मुली या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. मांजरीतून निघालेली मुले सध्या कोरेगाव पार्क येथे पोहचली असून नाशिक फाट्यावरून हा मार्च पुढे जाणार आहे. साधारण ३ ते ४ हजार विद्यार्थी यात ठिकठिकाणी सहभागी होणार आहेत.
सरकारविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:14 PM
वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
ठळक मुद्देआजपासून पुणे ते नाशिक पायी लॉंग मार्चआदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार राज्यातील मुले आणि मुली या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार