पुणे : श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजता बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली हाेती .
या निषेध सभेला पुणे प्रांताचे बिशप थॉमस डाबरे ,चर्च ऑफ नॉर्थ इंडिया चे बिशप राईट रेव्हरंड पॉल धुपारे , पं. वसंत गाडगीळ , डॉ.कुमार सप्तर्षी यांच्यासह धर्मगुरू ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
सभेचे निमंत्रक एडव्होकेट मार्कस देशमुख ,बिशप स्कुल चे प्राचार्य आणि सचिव जोएल एडविन यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
रेव्हरंड चंद्रशेखर जाधव ( मराठी मेथडिस्ट चर्च), रेव्हरंड व्ही. लुईस (डायोसी ऑफ पूना ), रेव्हरंड अनील कुमार, बौद्धाचार्य दिलीप धाईंजे ( भारतीय बौध्द महासभा ), पारशी धर्मगुरु एरवद नौशेद दस्तूर, मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती कासमी,माजी मंत्री रमेश बागवे, अन्वर राजन, प्रा.सुजाता हिवाळे, कल्पेश शिरसाट, उपस्थित होते.
' श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी आनंद साजरा करायला जमले असताना दुःखाचा घाला पडला, ही दुर्देवाची गोष्ट आहे. पण, मृत्युचा विजय न होता जीवनाचा होईल. आपण सर्व श्रीलंकेतील नागरिकंाच्या समवेत आहोत, हा संदेश सर्वत्र पोहोचवा, ' असा संदेश बिशप डाबरे यांनी दिला.