शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सुमित्रा भावे यांना कला क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:11 AM

कोणत्याही निर्मात्याने एचआयव्ही, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी विषय चित्रपटातून हाताळले नाहीत. पण भावे यांनी जिंदगी जिंदाबाद, देवराई, नितळ, अस्तू, कासव ...

कोणत्याही निर्मात्याने एचआयव्ही, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी विषय चित्रपटातून हाताळले नाहीत. पण भावे यांनी जिंदगी जिंदाबाद, देवराई, नितळ, अस्तू, कासव या चित्रपटांमध्ये संवेदनशीलरित्या हे विषय चित्रपटातून हाताळले आहेत. आजारांबाबतची वैज्ञानिक माहिती मनोरंजक पद्धतीने पोहोचवण्यासाठी आणि गैरसमज, मिथके दूर करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, हे समजलेल्या त्या समाजशास्त्रज्ञ आणि संशोधन होत्या. त्यांच्या चित्रपटांच्या रसिकांसाठी हे मोठे नुकसान आहे. शेवटच्या दोन चित्रपटांची निर्मिती मी केली होती. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे.

-डॉ. मोहन आगाशे (ज्येष्ठ अभिनेते)

---------------------------

मावशीच्या एका मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅमेरा अनुभवला. जिंदगी जिंदाबाद या आशयघन चित्रपटात काम करण्याची संधी मावशीने दिली आणि माझा चित्रपट प्रवास सुरू झाला. मावशी माझ्यासाठी सिनेमाचे विश्व खुले करणारी दूत होती. चित्रपट कलेचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या लोकांना तिने चित्रपट साक्षर केले. जगण्याची मूल्यव्यवस्था शिकवली. आयुष्याचा अर्थ शोधणारे सिनेमे तयार केले. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या नंतरचा मराठी सिनेमा अशी मांडणी करावी लागेल, इतके भरभरून योगदान त्यांनी दिले आहे.

- गिरीश कुलकर्णी, (अभिनेता)

--------------------------------

आज खूप विचित्र परिस्थितीमध्ये आहे. गेली ३५ वर्षे सुमित्रा भावे यांच्यासमवेत जगतोय. आम्ही इतकी वर्षे एकत्र काम देखील केले आहे. त्यामुळे दोघांबददल एकजिन्नसी किंवा विजोड प्रतिमा लोकांच्या मनात आहे. स्वत:ला वेगळं काढून त्यांच्याविषयी बोलता येणं अवघड जातंय. त्यांच्याबददल मला सातत्याने विचारणा होत आहे, तेव्हा मागे वळून बघताना एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबददल विचारचक्र सुरू झाले आहे. इतक्या जवळून काम करत असताना कदाचित हे लक्षात आलं नसेल. त्यांच्याबददल विचार करीत असताना अशा अनेक गोष्टी जाणवत आहेत. त्यात मुख्यत्वे एक गोष्ट जाणवत आहे की अभ्यासक आणि कलावंत म्हणून दोन्ही गोष्टी त्या करणा-या होत्या. त्यातून इतकं मोठ काम उभं राहिल आहे. त्यामुळं त्यांच्याबददल नितांत आदर वाटत आहे. शून्यातून हे सगळ दिग्दर्शनाच काम त्यांनी शिकत शिकत सुरू केलं आणि आमच्यासारख्या लोकांना त्यांनी घडवलं. त्यानंतर आम्ही एकत्र काम करायला लागलो. त्यांनी एक स्वतंत्र चित्रपट संस्कृती निर्माण केली असं वाटलं. पहिल्यांदा ‘बाई’ नावाचा लघुपट १९८५ मध्ये त्यांनी केला. आम्ही १९९५ पर्यंत केवळ लघुपट्च करीत होतो. मराठी चित्रपटाकडे कसं पाहूयात? कशासाठी आपण मुळात चित्रपट बनवायचाय? चित्रपट हा धंदा करण्यासाठी नाही, आपल्याला काहीतरी सांगायचंय, ती संस्कृती तयार व्हावी हा त्यामागील त्यांचा उददेश होता. त्याच रूपांतर ‘दोघी’ मध्ये झालं. एनएसडीसीने आम्हाला हा चित्रपट करण्यासाठी बोलावलं. तिथूनच मोठा चित्रपट करण्याचं ठरवलं. पूर्वीपासूनच साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि कलात्मक मांडणी लघुपटातून करायला सुरूवात केली होती, तिचं पुढं करीत राहाणार आहोत. बिंबवल. त्यांनी चांगला चित्रपट निर्मित करण्याचं जे स्कूल सुरू केलं, ते इतकी वर्ष सुरू राहीलं. त्या प्रवाहात जे आम्हाला दूरवरून पाहात होते ते आमच्याबरोबर जोडले गेले. चित्रपटसृष्टीचा एक चांगला प्रवाह आपल्याला तयार झाल्याचा पाहायला मिळतोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांकडे उत्सुकतेने पाहिले जातं. मराठी चित्रपट या पुरस्काराच्या यादीत असेल तर तो नक्कीच कलात्मक किंवा सामाजिक विषयांची मांडणी करणारा असणार असंच पाहिलं जातं. या जाणीवेने चित्रपट समीक्षक मराठी चित्रपटांकडे पाहात आहेत. हा चेहरा बदलण्याचं श्रेय सुमित्रा भावे यांना जातं. कोणत्याही गोष्टीचा मोह न बाळगता स्वत:च्याच तंद्रीमध्ये काम करत राहाणं त्यातून अनेक जण तयार होत गेले. यात तंत्रज्ञ, कलावंत यांचा समावेश आहे. ते सुमित्रा भावे यांचा वारसा चालवित आहेत. या गोष्टी आता हळूहळू प्रकर्षाने जाणवू लागतील. या बाईने जे बीज रोवलं त्याचा किती मोठा वटवृक्ष झाला आहे. त्याच्याशी कोण कोण जोडले गेले आहेत. हे हळूहळू दिसत राहील. त्या आज नाहीत म्हटल्यावर त्यांचं काम केवढं मोठं होतं हे जाणवत आहे.जणू काही एवढ्या मोठ्या व्यक्तीचं महत्व आपल्याला कळल होत की नाही असं वाटत आहे.

-सुनील सुकथनकर, (दिग्दर्शक)

-------------------------------------------------------------------

सुमित्रा भावे यांच्यामुळेच मी चित्रपट बनवू लागलो. त्यांची भेट झाली नसती, तर मी कधीच चित्रपट बनवला नसता. त्यांच्या एक अंतर्भूत ऊर्जा होती. एका पाठोपाठ एक चित्रपट त्या बनवत होत्या. त्यांनी असंख्य चित्रपट बनवले. वेगळ्या पद्धतीच्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी एकप्रकारे आम्हा सर्व कलाकारांना चित्रपट बनविण्याचा ध्यास दिला.

- उमेश कुलकर्णी (अभिनेते, दिग्दर्शक)

------------------------------------------------------------

संगीतात जशी घराणी असतात. तसेच सुमित्रा भावे हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक घराणे होते. त्यांच्यासोबत अनेकांनी काम करून त्यांच्याकडून चित्रपट निर्मितीचे धडे घेतले. त्यांच्यामुळे तयार झालेली अनेक लोक आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येकाने दिशा मिळवली. स्वत:चा शोध घेतला. एक विचार आणि धारणा असलेले सुमित्रा भावे हे एक घराणे होते असे मी अभिमानाने सांगेन. मी त्या घराण्याचा एक भाग आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय धाडसी आणि निडर होते. त्यांच्याशी आपुलकीचा बंध जुळला होता.

-आलोक राजवाडे (अभिनेते)

------------------------

आमचे दोघींचे मावशी-भाचीचे नाते होतेच. पण, त्या पलीकडे आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी होतो. त्यांनी मला कायम दिशा दिली. त्यांचं बोटं धरून मी या क्षेत्रात आले आणि त्यांच्यामुळेच मी घडले.त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला आहे. चित्रपट क्षेत्रही पोरके झाले आहे. पण, त्या पलीकडे आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी होतो. त्यांनी मला कायम दिशा दिली. त्यांचं बोटं धरून मी या क्षेत्रात आले आणि त्यांच्यामुळेच मी घडले.

-देविका दफतदार (अभिनेत्री)

--------------------------------------------

सुमित्रा भावे या संवेदनशील दिग्दर्शक तर होत्याच, परंतु आपल्या प्रत्येक चित्रपटामधून मानवतेची, प्रागतिक जीवनमूल्यांची कास धरून त्यांनी मराठी सांस्कृतिक विश्वाला एक वेगळे, प्रगल्भ परिमाण देऊ केले. स्त्रीचळवळीशी, ग्रामीण समस्यांशी जोडल्या गेलेल्या सुमित्रा यांनी अतिशय सकारात्मकतेने आपल्या भवतालाकडे बघत प्रेक्षकांच्या मनात कायम एक आशेचा अंकुर जागा ठेवला. स्त्रीप्रश्नाची आणि इतर सामाजिक प्रश्नांची त्यांची हाताळणी कला क्षेत्रासाठी पथदर्शक ठरली आहे. 'मिळून सा-याजणी' आणि अर्थातच विद्या बाळ यांच्याशी त्यांचा विशेष स्नेहबंध होता. त्यांच्या निधनाने 'मिळून सा-याजणी' परिवारातील एक जिवलग काळाच्या पडद्याआड गेला आहे.

-गीताली वि. मं. (संपादक, मिळून सा-याजणी) :

--------------------------------------------------------