शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मुख्याधिका-यांवर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करा; 'त्या' वृक्षाला व पक्ष्यांना इंदापूरकरांकडून श्रध्दांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:33 IST

प्राणी पक्षी असो वा माणूस,सर्वांचा जीव एकसारखाच, झाडाबरोबर पक्षी, त्यांची पिल्ले अंडी मारली गेली

इंदापूर: नगरपरिषदेने बेकायदेशीर तोडलेला वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचा सोबती असणारा चिंचेचा पुरातन वृक्ष व त्या कारवाईत मरण पावलेले असंख्य चित्रबलाक यांना इंदापूरच्या पक्षी व वृक्ष प्रेमी नागरिकांनी अश्रूपूर्ण वातावरणात सामूहिक श्रद्धांजली वाहिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यावर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी सामूहिकरीत्या करण्यात आली.

गढीच्या पायथ्याशी वृक्षाची कत्तल झाली. त्या ठिकाणी आज (दि.१८) सकाळी अकरा वाजता इंदापूर नागरी संघर्ष समिती, इंदापूर नेचर क्लब, युवा क्रांती प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, शिवभक्त परिवार, राष्ट्र सेवा दल, भटक्या विमुक्त जमाती संघटना, शिवदास जनकल्याण ट्रस्ट आदि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व निसर्गप्रेमी नागरिक जमले. चिंचेच्या वृक्षाला कुंकूम तिलक, फुले वाहून पुष्पहार अर्पण करत अश्रूपूर्ण नजरेने त्याला व मृत पक्ष्यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.    यावेळी बोलताना नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, वीरश्री मालोजीराजे भोसले यांनी लावलेले हे झाड लावले होते. इंदापूरकरांच्या अनेक पिढ्यांची जडणघडण पहाणारे हे झाड तोडताना मुख्याधिका-यांनी गढी उध्वस्त करण्याचा घाट घातला. प्राणी पक्षी असो वा माणूस,सर्वांचा जीव एकसारखाच असतो. झाडाबरोबर पक्षी, त्यांची पिल्ले ही गेली,त्यांची अंडी गेली. हे सारे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यामुळेच झाले,असे सांगून महाराष्ट्र शासन जागृत असेल तर त्याने रामराजे कापरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून,त्यांना निलंबित करावे,अशी मागणी प्रा.ताटे यांनी केली.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे म्हणाले की, चिंचेचा वृक्ष तोडून तालुक्याची अस्मिता असणारी, वीरश्री मालोजीराजे भोसले यांची पुरातन गढी उध्वस्त करण्याचे कारस्थान मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे. शेकडो संरक्षित पक्ष्यांचा अंत केला आहे. मुख्याधिकारी यांच्या नावात राम असला तरी त्यांनी काम मात्र रावणासारखे काम केले आहे.  त्यामुळे वन विभाग, तहसिलदार व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी धोत्रे यांनी केली. तेथून हे सर्वजण इंदापूर पोलीस ठाण्यात गेले. वरील प्रकरणासंदर्भात दिलेल्या तक्रारी अर्जावरील कार्यवाहीबद्दल पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांनी विचारणा केली. त्यावर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक पवार यांनी दिले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरenvironmentपर्यावरणcommissionerआयुक्तSocialसामाजिक