बारामती : तिरंगा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनदरम्यान असलेल्या मंदीच्या काळातही नामांकित कंपनीमध्ये ‘प्लेसमेंट’ मिळाली आहे.
तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्हीएफएक्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ॲनिमेशन हा कोर्स पूर्णपणे कौशल्य विकसित अशा अभ्यासक्रमावर आधारित आहे. ॲनिमेशन इंडस्ट्रीजला आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे व व्यावसायिक गुणांचा सर्वांगीण विकास हा विविध प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सातत्याने तिरंगा कॉलेजमध्ये केला जातो. ॲनिमेशन इंडस्ट्रीजचा अनुभव असलेल्या शिक्षकांमार्फत व विविध विषयातील तज्ज्ञांच्या लेक्चरद्वारे विद्यार्थ्यांना विकसित करण्यात येते, असे तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष व तिरंगा कॉलेजचे चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण युवा विकासासाठी अॅॅनिमेशन हा उत्तम करिअरचा पर्याय आहे. सर्व विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करता येते असे क्षेत्र असल्याचे शिंदे म्हणाले.
तिरंगा फाउंडेशनच्या सचिव रजनी शिंदे यांनी मुलींसाठी विशेष कार्यक्रम राबविले जातात, हे या वेळी नमूद केले. चेअरमन, सचिव यांच्या तिरंगा फाउंडेशनचे डायरेक्टर व कार्पोरेट रिलेशन, डॉ. पोपटराव मोहिते यांनी नमूद केले की, प्राचार्य रवी तिकटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
खालीलप्रमाणे प्लेसमेंट झाल्या आहेत. राहुल सूर्यवंशी याला मॉडेलिंग अॅण्ड टेक्स्चरिंग आर्टिस्ट या पदावर , येसपेस लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत, तर कुणाल नाळे याला ग्राफिक्स डिझाईनर या पदावर पोस्ट कार्ड इंडिया या कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे.