बारामती: तिरंगा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोना संसर्ग साथीच्या काळात कोरोनाबाधितांना आधार देणे गरजेचे होते. या काळात तिरंगा फाउंडेशनने कोरोना सेंटर उभारून अडचणीच्या काळात कौतुकास्पद काम केले आहे, असे प्रतिपादन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
तिरंगा फाउंडेशन संचलित कोरोना सेंटरला डॉ. मुळीक यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उद्योजक हणमंत मोहिते, भू-माता शेतकरी संघटनेचे नेते धर्माअप्पा जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, उद्योजक सुरेश पवार, प्रशांत जगताप, बारामती लाईफ लाईनचे डॉक्टर सचिन घोरपडे, गोळेवाडी कोरेगाव सरपंच शंकर गोरे-पाटील, डॉ. बाबासाहेब माने, डॉ. रोहित शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल चांदगुडे, डॉ. इंद्रजीत भोसले, डॉ. बाबासाहेब माने, डॉ. रोहित शिंदे, डॉ. गणेश निकम सेवा देत आहेत. कोरोना रुग्ण अद्याप विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत. दानशूरांनी त्यासाठी मदत करावी. या सेंटरसाठी रुग्णांना ऑक्सिजन लागल्यास तेवढाच चार्ज आकारण्यात येईल, असे तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी सांगितले. सूत्रसंचालन शेतकरी संघटनेचे प्रमोद गाडे यांनी केले. आभार धनंजय पवार यांनी मानले.