शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

जलतरणात तनिश, रूद्र यांचा ट्रिपल धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 2:26 AM

१४ वर्षांखालील गट : आरूष बढे, इशान खरे २ प्रकारांत अव्वल

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जलतरण स्पर्धेत तनिश कुंडले आणि रूद्र इंगळे या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करताना १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये ३ प्रकारांत विजेतेपद पटकावले. आरूष बढे, इशान खरे २ प्रकारांत अव्वल अव्वल ठरले. डेक्कन जिमखान्याच्या टिळक जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलचा खेळाडू असलेल्या तनिश कुडले याने १०० मीटर आणि २०० मीटर बटरफ्लाय तसेच २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात बाजी मारली. त्याने १०० मीटर प्रकारात १ मिनिट ८.२१ सेकंद तर, २०० मीटरमध्ये २ मिनिटे ३०.८० सेकंद अशी वेळ दिली. सेवासदनच्या रूद्र इंगळे याने ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारांत विजेतेपद प्राप्त केले.

मिलेनियमचा आरूष बढे ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारांत अव्वल ठरला. न्यू इंडिया स्कूलच्या इशान खरे याने २०० आणि ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात न्यू इंडिया स्कूलच्या संघाने ४ मिनिटे ५९.६७ सेकंद वेळेसह बाजी मारली. ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात ५ मिनिटे १८.२८ सेकंद अशी वेळ देणाऱ्या मिलेनियम संघाने प्रथम स्थान प्राप्त केले.निकाल : १४ वर्षांखालील मुले५० मीटर फ्रीस्टाईल : आरूष बढे (मिलेनियम, २८.१६), सलील भागवत (विद्याभवन, ३१.९८), आरव पेटकर (अभिनव इंग्रजी माध्यमिक शाळा, ३२.२५). १०० मीटर फ्रीस्टाईल : आरूष बढे (मिलेनियम, १ मिनिट ३.२० सेकंद), इशान खरे (न्यू इंडिया, १.७.२६), वरूण चव्हाण (क्रूट मेमोरियल, १.९.२३). २०० मीटर फ्रीस्टाईल : इशान खरे (न्यू इंडिया, २.३०.७८), हर्ष दात्ये (मिलेनियम, २.४०.२२), ऋषी सहस्रबुद्धे (गुरूकुल, २.४१.२२). ४०० मीटर फ्रीस्टाईल : इशान खरे (न्यू इंडिया, ५.२६.१७),हर्ष दात्ये (मिलेनियम, ५.४०.७६), ऋषी सहस्रबुद्धे (गुरूकुल, ५.४०.८८). ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईलरिले : न्यू इंडिया स्कूल (४ मिनिटे ५९.६७ सेकंद), डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल (५.११.३३), अभिनव इंग्रजी माध्यमिक स्कूल (५.२०.७१).५० मीटर बटरफ्लाय : अर्णव भादेकर (मिलेनियम, ३२.६५ सेकंद), इशान लोपिस (लॉयला, ३२.६६), अर्णव मुंडले (डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, ३३.७४). १०० मीटर बटरफ्लाय : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, १.८.२१), अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, १.११.४६), अर्णव भादेकर (मिलेनियम, १.१६.९४). २०० मीटर बटरफ्लाय : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, २.३०.८०), अर्णव भादेकर (मिलेनियम, २.५५.४१), चैतन्य पाटील (सेंट व्हिन्सेंट, ३.१५.९३).५० मीटर बॅक स्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, ३३.९१), सलील भागवत (विद्याभवन, ३९.७३), अथर्व सुतार (बिशप्स, ४२.११). १०० मीटर बॅकस्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, १.१३.६७), इथान लोपिस (लॉयला, १.१९.९७), हर्षवर्धन चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, शनिवारपेठ, १.२३.८३). २०० मीटर बॅक स्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, २.४२.१४), हर्षवर्धन चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, २.५५.२१), हर्ष दात्ये (मिलेनियम, ३.२.६).५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : पार्थ कुंडले(सह्याद्री नॅशनल स्कूल, ३९.५८), पार्थ महाजन (मिलेनियम, ४०.४९), अभिजित कोपर्डे (भारती विद्यालय, ४०.६३). १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : वरूण चव्हाण (क्रूट मेमोरियल, १.२४.३४), आरव पेटकर (अभिनव इंग्रजी माध्यमिक शाळा, १.२७.९०), पार्थ महाजन (मिलेनियम, १.२७.९३). २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, २.५७.३१), आरूष बढे (मिलेनियम, ३.०.७९), पार्थ कुडळे (सह्याद्री नॅशनल स्कूल, 3.१९.८३).४ बाय १०० मीटर मिडले रिले : मिलेनियम (५ मिनिटे १८.२८ सेकंद), न्यू इंडिया (५.२७.१४), डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल (६.२.८०). २०० मीटर वैयक्तिक मिडले : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, २.३७.१२), अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, २.४१.९), चैतन्य पाटील (सेंट व्हिन्सेंट, २.५६.८२).

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा