सोमवारी (दि. २७) ह.भ.प.हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद नंतर महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती आजरेकर फड सांप्रदायिक वारकरी मंडळाचे आयोजक पांडुरंग पवार व चोपदार नवनाथ पिंपरे यांनी दिली.
यावेळी भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, गाथा भजन करण्यात येणार आहे. ह.भ.प. सोपान काका मुळे ( मुंबई ), ह.भ.प. अण्णासाहेब मिरजकर (अथणी), ह.भ.प. शिवम कदम (रायगड) यांचे हरिकीर्तन होणार आहे.
रविवार रोजी वै.जगदेव अण्णा विणेकरी यांच्या पुण्यस्मरणार्थ हभप हरिदास बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवासाठी शहा सांस्कृतिक भवन येथे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा व इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शहा यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी प्रदीप पवार, भीमराव शिंदे, अशोक जाधव यांच्यासह वारकरी उपस्थित होते.
————————————————
फोटो ओळी : इंदापूर येथे शहा सांस्कृतिक भवन येथे आजरेकर फडाच्या वतीने अमृतयोग उत्सवास सुरुवात करताना आजरेकर माऊली व वारकरी.
२४०९२०२१-बारामती-०५
————————————————