पुणे : विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला.महापालिका सभागृहात प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सायकल शेअरिंग योजनेचे सादरीकरण झाले. त्यावेळी बोलताना बागवे यांनी आम्हाला सोशल मीडिया वरून टार्गेट केले जात आहे, असा आरोप केला.पुणे सायकल ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे. त्यावर सायकल शेअरिंगला विरोध करणारे म्हणून खासदार वंदना चव्हाण, तुपे, बागवे, आबा बागूल यांची नावे व मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. यांना मेसेज करा, फोन करा असे आवाहन करण्यात आले असल्याचे बागवे म्हणाले. याची चौकशी केली असता महापालिकेतूनच हा प्रकार सुरू असल्याचे कळाल्याचा गंभीर आरोप बागवे यांनी केला. त्यानंतर तुपे यांनीही हाच आरोप करीत आम्ही त्याला घाबरत नाही असे सांगितले. आमचा योजनेला पाठिंबाच आहे, पण त्यातील त्रुटी दाखवायच्या नाहीत का असा सवाल त्यांनी केला. ट्रोल करण्याच्या या प्रकाराचा आपण निषेध करत आहे, असे ते म्हणाले.
विरोध करणाऱ्यांना केले जात आहे ट्रोल; पुणे महापालिकेतील प्रकार, पुरावे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:18 PM
विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला.
ठळक मुद्देआम्हाला सोशल मीडिया वरून टार्गेट केले जात आहे : चेतन तुपे, अविनाश बागवेमहापालिका सभागृहात प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सायकल शेअरिंग योजनेचे सादरीकरण